देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले.
Cross references
मी समुद्राला मर्यादा घातल्या आणि त्याला कुलुपांनी बंद केलेल्या दरवाजाबाहेर थोपविले.
ईयोब, तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?
ते चंद्राप्रमाणे सदैव राहील. आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे. तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही.
तू सदा सर्वदा इमानदार असतोस, परमेश्वरा. तू पृथ्वी निर्माण केलीस आणि ती अजूनही आहे.
परमेश्वराने आकाशाची निर्मिती केली तेव्हा मी तिथे होते. परमेश्वराने कोरड्या भूमीभोवती सीमा आखण्यासाठी वर्तूळ काढले तेव्हा मी तिथे होते. त्याने सागराला सीमित केले तेव्हा मी तिथे होते.
देव म्हणतो, “नोहाच्या काळात प्रलय आणून मी जगाला शिक्षा केली होती ते आठव. पण, पुन्हा प्रलय घडवून जग नष्ट करणार नाही असे वचन मी नोहाला दिले होते. त्याचप्रमाणे मी आता तुला वचन देतो की मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुझी खरडपट्टी ही काढणार नाही.”
परमेश्वर म्हणतो, “परमेश्वर दिवसा सूर्याला प्रकाशित करतो आणि रात्री चंद्र व तारे यांना प्रकाशित करतो. परमेश्वर समुद्र घुसळतो म्हणून समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात. सर्वशक्तिमान परमेश्वर असे त्याला म्हणतात.”
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “इस्राएलचे वंशज कधीही राष्ट्र बनल्याखेरीज राहणार नाहीत. सूर्य, चंद्र, तारे व समुद्र ह्यांच्यावरील माझे नियंत्रण ढळले, तरच असे होणे शक्य आहे.”
परमेश्वर म्हणतो, “माझा दिवस व रात्र यांच्याबरोबरच्या कराराचा जर भंग झाला आणि मी जर आकाश आणि पृथ्वी ह्यांच्यासाठी नियम केले नसते, तर कदाचित् मी त्या लोकांना सोडले असते.