Home Bibles स्तोत्रसंहिता 143:4 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 143:4 · मराठी बायबल

मी आशा सोडण्याच्या तयारीत आहे. माझा धीर सुटत चालला आहे.

Cross references

ईयोब 6:27

पोरक्या मुलांच्या वस्तू जिंकून घेण्यासाठी तुम्ही जुगार खेळायलाही तयार आहात. तुम्ही तुमच्या मित्रालाही विकून टाकाल.

स्तोत्रसंहिता 25:16

परमेश्वरा, मी दु:खा एकाकी आहे. माझ्याकडे वळ व मला दया दाखव.

स्तोत्रसंहिता 55:5

मी भीतीने थरथर कापत आहे. मी भयभीत झालो आहे.

स्तोत्रसंहिता 61:2

मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.

स्तोत्रसंहिता 77:3

मी देवाचा विचार करतो आणि मला काय वाटते ते त्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मला ते शक्य नाही.

स्तोत्रसंहिता 77:6

रात्री मी माझ्या गाण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो. मी स्व:तशीच बोलतो आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

स्तोत्रसंहिता 102:1

परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे.

स्तोत्रसंहिता 102:3

माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे. हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.

स्तोत्रसंहिता 119:81

परमेश्वरा, तू माझा उध्दार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे. पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.

स्तोत्रसंहिता 124:4

आपल्या शत्रूंचे सैन्य महापुरासारखे आपल्या अंगावरुन गेले असते. नदी प्रमाणे त्यांनी आपल्याला बुडवले असते.

स्तोत्रसंहिता 142:3

माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला आहे मी आता आशा सोडण्याच्या तयारीत आहे. पण माझे काय होत आहे ते परमेश्वराला माहीत आहे.

स्तोत्रसंहिता 142:4

मी भोवताली बघतो पण मला माझे कुणीही मित्र दिसत नाहीत. पळून जाण्यासाठी मला कुठलीही जागा नाही. मला वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करीत नाही.

लूक 22:44

दु;खाने ग्रासलेला असतानासुद्धा त्याने अधिक काकुळतीने प्रार्थना केली. आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.

Interlinear

Choose Theme