Home Bibles स्तोत्रसंहिता 143:3 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 143:3 · मराठी बायबल

पण माझे शत्रू माझा पाठलाग करीत आहेत. त्यांनी माझे आयुष्य घाणीत बरबाद केले आहे. ते मला खूप पूर्वी मेलेल्या लोकांसारखे अंधाऱ्याथडग्यात लोटत आहेत.

Cross references

2 शमुवेल 2:22

पुन्हा अबनेर त्याला म्हणाला, “हा पाठलाग थांबव नाहीतर मला तुला मारावे लागेल आणि तसे झाले तर तुझा भाऊ यवाब याला मी तोंड दाखवू शकणार नाही.”

2 शमुवेल 18:11

यवाब त्या माणसाला म्हणाला, “मग तू त्याचा वध करुन त्याला जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा रौप्यमुदा आणि एक पट्टा इनाम दिला असता.”

स्तोत्रसंहिता 7:1

परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे. माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.

स्तोत्रसंहिता 7:5

जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर. शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो. त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.

स्तोत्रसंहिता 7:6

परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द लढ. परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.

स्तोत्रसंहिता 17:9

परमेश्वरा, जे वाईट लोक माझा निपात करायला निघाले आहेत त्यांच्यापासून मला वाचव माझ्याभोवतीचे जे लोक मला दुख द्यायला निघाले आहेत, त्यांच्यापासून माझे रक्षण कर.

स्तोत्रसंहिता 31:12

मी हरवलेल्या हत्यारासारखा आहे लोक मला पूर्णपणे विसरुन गेले आहेत.

स्तोत्रसंहिता 35:4

काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर. त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत. त्यांना गोंधळात अडचणीत टाक.

स्तोत्रसंहिता 54:3

जे देवाची उपासना करत नाहीत असे परके माझ्या विरुध्द गेले आहेत आणि शक्तिशाली लोक मला मारायला निघाले आहेत.

स्तोत्रसंहिता 88:4

लोक मला आताच मृत आहे असे समजून वागवतात. मी जगायला अगदी शक्तिहीन आहे असे समजून वागवतात.

स्तोत्रसंहिता 142:6

परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक मला तुझी फार गरज आहे. जे लोक माझा पाठलाग करतात त्यांच्यापासून मला वाचव. ते लोक मला फार भारी आहेत.

विलापगीत 3:6

त्याने मला अंधकारात बसायला लावले. माझी स्थिती एखाद्या मृताप्रमाणे केली.

यहेज्केल 37:11

मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे म्हणजे जणू काही सर्व इस्राएली कुळच आहे. इस्राएलचे लोक म्हणतात, ‘आमची हाडे सुकून गेली आहेत.आम्हाला आशा राहिलेली नाही. आमचा संपूर्ण नाश झाला आहे.’

मीखा 7:8

मी पडलो आहे. पण शत्रूंनो, मला हसू नका. मी पुन्हा उठेन आता मी अंधारात बसतोय पण परमेश्वरच माझा प्रकाश होईल.

Interlinear

Choose Theme