Cross references
तेव्हा यरुशलेममध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, “आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निधून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरुशलेमच्या लोकांना तो मारून टाकेल.”
त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते. देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत.
माझ्यावर आलेल्या प्रसंगांचा विचार करायला लागलो म्हणजे मला भीती वाटते आणि माझ्या शरीराचा थरकाप होतो.
म्हणूनच मी देवाला भितो. मी या गोष्टी समजू शकतो आणि म्हणून मला देवाची भीती वाटते.
सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले. देव त्याच्या मंदिरात होता. त्याने माझा आवाज ऐकला. त्याने माझी मदतीची हाक ऐकली.
देवा, मी खूप दु:खी आहे म्हणूनच मी तुला बोलावले. मी यार्देनच्या दरीपासून हर्मोनच्या डोंगरावर आणि मिसहारच्या टेकडीवर गेलो.
मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
मी तरुणपणापासूनच अशक्त आणि आजारी आहे. मी तुझा राग सोसला आहे आणि मी असहाय्य आहे.
परमेश्वरा, मला तुझी भीती वाटते, मी घाबरतो आणि तुझ्या नियमांना मान देतो.
मी चिंताग्रस्त आहे आणि भीतीने थरथर कापत आहे. माझी प्रसन्न संध्याकाळ काळरात्र बनली आहे.
ते शोकप्रदर्शक कपडे घालतील आणि अतिशय भयभीत होतील. प्रत्येक चेहरा लज्जित झालेला तुम्हाला दिसेल. दु:ख प्रकट करण्यासाठी ते आपली डोकी भादरतील.
दु;खाने ग्रासलेला असतानासुद्धा त्याने अधिक काकुळतीने प्रार्थना केली. आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.