Home Bibles स्तोत्रसंहिता 123:2 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 123:2 · मराठी बायबल

गुलाम त्यांना लागणाऱ्या वस्तूंसाठी मालकावर अवलंबून असतात.

Cross references

उत्पत्ति 32:26

मग तो पुरुष याकोबास म्हणाला, “आता मला जपरंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिलाच पाहिजेस नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही.”

उत्पत्ति 49:18

“हे परमेश्वरा, तुझ्या कडून उध्दार होण्याची मी वाट पाहात आहे.”

यहोशवा 9:23

“तेव्हा आता तुम्हाला अडचणींना तोड द्यावे लागेल. तुम्हा सर्वांना आमचे दास व्हावे लागेल. तुम्हाला देवाच्या घरासाठी लाकूडतोडे व पाणक्ये म्हणून काम करावे लागेल.”

यहोशवा 9:27

यहोशवाने त्यांना इस्राएल लोकांचे दास केले. लाकडे फोडणे आणि पाणी भरणे ही कामे ते इस्राएल लोकांसाठी आणि परमेश्वराच्या वेदीसाठी करत राहिले. परमेश्वर जे ठिकाण वेदीसाठी निवडील तेथे तेथे त्यांनी हे केले. आजतागायत ते तसेच दास आहेत.

यहोशवा 10:6

ते पाहून गिबोनच्या लोकांनी गिलगालच्या छावणीत यहोशवाला निरोप पाठवला, “आम्हा दासांना एकटे पडू देऊ नका आमच्या मदतीला या. विनाविलंब आमचे रक्षण करा. डोंगराळ प्रदेशातील सर्व अमोरी राजांनी एकत्र येऊन आमच्यावर हल्ला केला आहे.”

1 राजे 1:20

महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत.

2 इतिहास 20:12

“देवा, या लोकांना चांगले शासन कर. आमच्यावर चाल करुन येणाऱ्या या भल्या थोरल्या सेनेला तोंड द्यायचे सामर्थ्य आमच्यात नाही. आम्हाला काही सुचेनासे झाले आहे. म्हणून आम्ही मदतीसाठी तुझ्याकडे आलो आहोत.”

स्तोत्रसंहिता 25:15

मी नेहमी परमेश्वराकडे मदतीसाठी दृष्टी वळवतो. तो नेहमी माझी संकटातून मुक्तता करतो.

स्तोत्रसंहिता 40:1

मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले.

स्तोत्रसंहिता 119:82

तू ज्या गोष्टींचे वचन दिले होतेस त्या शोधता शोधता माझे डोळे अगदी थकून गेले आहेत. परमेश्वरा, तू कधी माझे सांत्वन करणार आहेस?

स्तोत्रसंहिता 119:123

परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.

स्तोत्रसंहिता 130:5

मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे.

विलापगीत 3:25

परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो.

लूक 18:1

त्यांनी नेहमी आशा न सोडता प्रार्थना करावी व ती करण्याचे कधीच सोडू नये हे शिकविण्यासाठी त्याने त्यांना एक बोधकथा सांगितली.

Interlinear

Choose Theme