Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 119:123 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:123 · मराठी बायबल

परमेश्वरा, तुझ्या मदतीची आणि तुझ्या चांगल्या शब्दाची वाट बघून माझे डोळे आता शिणले आहेत.

Cross references

स्तोत्रसंहिता 69:3

मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे. माझा घसा दुखत आहे. मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत तुझ्या मदतीची वाट पाहिली.

स्तोत्रसंहिता 119:41

परमेश्वरा, मला तुझे खरे प्रेम दाखव. कबूल केल्याप्रमाणे तू मला वाचव.

स्तोत्रसंहिता 119:81

परमेश्वरा, तू माझा उध्दार करशील म्हणून वाट बघता बघता मी आता मरुन जाणार आहे. पण परमेश्वरा, तू जे सांगतोस त्यावर माझा विश्वास आहे.

स्तोत्रसंहिता 130:6

मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.

स्तोत्रसंहिता 143:7

परमेश्वरा, त्वरा करुन मला उत्तर दे. माझा धीर आता सुटला आहे. माझ्यापासून दूर जाऊ नकोस. मला मरु देऊ नकोस आणि थडग्यात पडलेल्या मेलेल्या माणसांप्रमाणे मला होऊ देऊ नकोस.

विलापगीत 4:17

मदतीची वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत. पण कोठूनही मदत मिळत नाही. आमचेरक्षण करण्यास एखादे राष्ट्र येत आहे का, ह्यची आम्ही बुरुजावरुन टेहळणी केली. पण एकही देश आमच्याकडे आला नाही.

Interlinear

Choose Theme