Home Bibles स्तोत्रसंहिता 119:47 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:47 · मराठी बायबल

मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते. परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात.

Cross references

ईयोब 23:11

मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.

स्तोत्रसंहिता 19:7

परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे. ती देवाच्या लोकांना शक्ती देते. परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे. त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते.

स्तोत्रसंहिता 112:1

परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.

स्तोत्रसंहिता 119:16

मला तुझे नियम आवडतात. मी तुझे शब्द विसरणार नाही.

स्तोत्रसंहिता 119:24

तुझा करार माझा सर्वांत चांगला मित्र आहे. तो मला चांगला उपदेश करतो.

स्तोत्रसंहिता 119:48

परमेश्वरा, मी तुझ्या आज्ञांची स्तुती करतो. मला त्या आवडतात आणि मी त्यांचा अभ्यास करीन.

स्तोत्रसंहिता 119:97

परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते. मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.

स्तोत्रसंहिता 119:113

परमेश्वरा, जे लोक तुझ्याशी पूर्णपणे प्रामाणिक नाहीत त्या लोकांचा मी तिरस्कार करतो, पण मला तुझी शिकवण आवडते.

स्तोत्रसंहिता 119:119

परमेश्वरा, तू वाईट लोकांना पृथ्वीवर कचऱ्याप्रमाणे फेकून दे. म्हणजे मग मी तुझ्या करारावर सदैव प्रेम करीन.

स्तोत्रसंहिता 119:127

परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला तुझ्या आज्ञा आवडतात.

स्तोत्रसंहिता 119:140

परमेश्वरा, आम्ही तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो याबद्दलचा पुरावा आमच्याजवळ आहे आणि मला ते आवडते.

स्तोत्रसंहिता 119:159

बघ, मी तुझ्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परमेश्वरा, तुझ्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे.

स्तोत्रसंहिता 119:163

मला खोटे आवडत नाही. मला त्याचा वीट आहे पण परमेश्वरा, मला तुझी शिकवण आवडते.

स्तोत्रसंहिता 119:167

मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा, मला तुझे नियम खूप आवडतात.

स्तोत्रसंहिता 119:174

परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास असे मला वाटते. पण तुझी शिकवण मला आनंद देते.

योहान 4:34

येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय.

रोमकरांस 7:12

म्हणून आम्ही असा निष्कर्ष काढतो की, नियमशास्त्र पवित्र आहे आणि आज्ञा पवित्र, नीतिमान आणि उत्तम आहेत.

रोमकरांस 7:16

आणि ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाही त्याच करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे हे मान्य करतो.

रोमकरांस 7:22

माझ्या आत असलेला मनुष्य देवाच्या नियमशास्त्रामुळे आनंद करतो.

फिलिप्पैकरांस 2:5

ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या.

1 पेत्र 2:21

यासाठी देवाने आपल्याला बोलावले आहे; कारण ख्रिस्ताने देखील आपल्यासाठी दु:ख सहन केले आणि त्याच्या पावलांवर पाऊल टाकून चालावे, म्हणून स्वत:च्या अशा वागण्याने आपल्यासमोर उदाहण ठेवले.

Interlinear

Choose Theme