Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 119:159 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 119:159 · मराठी बायबल

बघ, मी तुझ्या आज्ञा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परमेश्वरा, तुझ्या सगळ्या प्रेमासकट मला जगू दे.

Cross references

2 राजे 20:3

“परमेश्वर, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला.

नहेम्या 5:19

देवा, या लोकांकरीता मी जे भले केले ते ध्यानात असू दे.

नहेम्या 13:22

मग मी लेवींना त्यांच्या शुध्दीकरणाची आज्ञा दिली. ते पार पाडल्यावर त्यांना वेशींची राखण करायची होती. शब्बाथ हा दिवस म्हणून राखून ठेवला होता याची खात्री करण्यासाठी असे केले होते.देवा, या गोष्टी केल्याबद्दल कृपया माझे स्मरण ठेव. माझ्यावर लोभ असू दे आणि तुझे महान प्रेम मला मिळूदे.

स्तोत्रसंहिता 119:47

मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते. परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात.

स्तोत्रसंहिता 119:97

परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते. मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.

स्तोत्रसंहिता 119:153

ख बघ आणि माझी सुटका कर. मी तुझी शिकवण विसरलो नाही.

Interlinear

Choose Theme