देवाने आज्ञा केली आणि टोळ व नाकतोडे आले. ते संख्येने इतके होते की ते मोजता येत नव्हते.
Cross references
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे मग मिसरवर टोळ धाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.”
ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत.
त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरमधील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही.
देवाने त्यांची पिके नाकतोड्यांच्या हवाली केली आणि इतर झाडांवर टोळ धाड पाठवली.
जे नाकतोड्याने खाल्ले व जे कुसरूडाने सोडले, ते घुल्याने खाल्ले.
“मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले. तुमचे जे काही होते ते, नाकतोडे, टोळ, कुसरूड व घुले यांनी खाल्ले.पण, मी, परमेश्वर, तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.
मग धुरातून टोळधाड पृथ्वीवर आली. त्यांनापृथ्वीवरील विंचवासारखा दंश करण्याचा अधिकार दिला होता.