म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली. जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले. नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले.
Cross references
हे इथले लोक मरतील. पण ते जर सामान्य रीतीने मेले-जशी माणसे नेहमी मरतात-तर त्यावरून असे दिसेल की परमेश्वराने मला खरंच पाठवल नाही.
जेव्हा मोशेचे बोलणे संपले तेव्हा त्या लोकांच्या पायाखालची जमीन दुभागली.
धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.
त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता.
त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.