Home Bibles गणना 16:32 · मराठी बायबल
गणना 16:32 · मराठी बायबल

धरतीने जणू आपले तोंड उघडून त्यांना गिळून टाकले. कोरहची सगळी माणसे, त्याचे संपूर्ण घराणे आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जमिनीत गेली.

Cross references

उत्पत्ति 4:11

तू तुझ्या भावाला ठार केलेस. त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे. ह्याच कारणाने तू शापित आहेस. भूमी तुला नकारेल.

गणना 4:18

“सावध राहा! कहाथी लोकांचा नाश होऊदेऊ नका;

गणना 16:17

तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यात ऊद-धूप टाकावा आणि ते परमेश्वराला द्यावे. नेत्यांसाठी 250 भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”

गणना 16:30

पण जर परमेश्वराने या लोकांना वेगव्व्या नव्या रीतीने मारले-तर तुम्हांला कळेल की त्यांनी परमेश्वराविरुद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे: धरती दुभागेल आणि त्या लोकांना आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.”

गणना 26:10

त्यावेळी धरती दुंभगली आणि तिने कोरह आणि त्याचे पाठिराखे यांना गिळकृंत केले. आणि 250 माणसे मेली. तो इस्राएलच्या इतर लोकांना इशारा होता.

गणना 26:11

परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मेले नाहीत.

गणना 27:3

“आम्ही वाळवंटातून प्रवास करीत असताना आमचे वडील गेले. त्यांना नैसर्गिक मरण आले. ते कोरहाच्या समूहाला मिळण्यांपैकी नव्हते (कोरह हा परमेश्वराच्या विरुद्ध जाणाऱ्यापैकी होता.) पण आमच्या वडिलांना एकही मुलगा नव्हता.

अनुवाद 11:6

त्याचप्रमाणे रऊबेनाचा मुलगा अलीयाब याच्या दाथान व अबीराम या मुलांचे देवाने काय केले ते तुम्हांला माहीत आहे. त्यांना आणि त्यांचे कुटुंबिय, त्यांचे तंबू, नोकरचाकर व गायीगुरे यांना सर्व इस्राएलीदेखत पृथ्वीने आपल्या पोटात घेतले.

1 इतिहास 6:22

कहाथचे वंशज असे: कहाथचा मुलगा अम्मीनादाब. अम्मीनादाबचा कोरह. कोरहचा मुलगा अस्सीर.

1 इतिहास 6:37

सफन्या तहथचा मुलगा. तहथ अस्सीरचा मुलगा. अस्सीर एव्यासाफचा मुलगा. एव्यासाफ कोरहचा मुलगा.

स्तोत्रसंहिता 84:1

सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे.

स्तोत्रसंहिता 85:1

परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव. याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत. कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.

स्तोत्रसंहिता 88:1

परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे.

स्तोत्रसंहिता 106:17

म्हणून देवाने त्या मत्सरी लोकांना शिक्षा केली. जमीन दुभंगली आणि तिने दाथानला गिळले. नंतर ती मिटली आणि तिने अबिरामच्या समुदायाला झाकून टाकले.

यशया 5:14

पण ती सर्व मोठी माणसे मरतील व (शिओल) अधोलोकात अधिक भर पडेल. मृत्यु आपला अजस्त्र जबडा पसरेल आणि ते सर्व लोक खाली अधोलोकात जातील.”

प्रकटीकरण 12:16

पण पृथ्वीने तिला मदत केली. पृथ्वीने तिचे तोंड उघडले व त्या प्रचंड सापाच्या तोंडातून आलेली नदी तिने गिळूनटाकली.

Interlinear

Choose Theme