Home Bibles ☰ Books स्तोत्रसंहिता 104:35 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 104:35 · मराठी बायबल

पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो. दुष्ट लोक कायमचे निघून जावोत. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.

Cross references

शास्ते 5:31

परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो! आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोतर सामर्ध्यवान होवोत!अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.

स्तोत्रसंहिता 1:4

परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.

स्तोत्रसंहिता 37:38

परंतु जे लोक नियम पाळत नाहीत त्यांचा नाश होईल. आणि त्यांच्या संततीला देश सोडून जाणे भाग पडेल.

स्तोत्रसंहिता 59:13

रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर.नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.

स्तोत्रसंहिता 68:1

देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव. त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.

स्तोत्रसंहिता 73:27

देवा, जे लोक तुला सोडून जातात ते लोक हरवतील. जे लोक तुझ्याशी प्रामाणिक नाहीत त्यांचा तू नाश करशील.

स्तोत्रसंहिता 101:8

मी या देशात राहाणाऱ्या वाईट लोकांचा नेहमी नाश करेन. दुष्ट लोकांनी परमेश्वराचे शहर सोडून जावे यासाठी मी त्यांच्यावर जबरदस्ती करेन.

स्तोत्रसंहिता 103:1

माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे.

स्तोत्रसंहिता 103:22

परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.

स्तोत्रसंहिता 104:1

माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस.

स्तोत्रसंहिता 105:45

देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्रसंहिता 106:48

परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”

स्तोत्रसंहिता 145:20

जे परमेश्वरावर प्रेम करतात त्यांचे तो रक्षण करतो. परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.

Interlinear

Choose Theme