Home Bibles स्तोत्रसंहिता 104:34 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 104:34 · मराठी बायबल

मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते. मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.

Cross references

उत्पत्ति 24:63

तो एका संध्याकाळी ध्यानमनन करण्यास शेतात गेला असता त्याने नजर वर करुन पाहिले तेव्हा त्याला दूर अंतरावरुन उंट येताना दिसले;

स्तोत्रसंहिता 1:2

चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.

स्तोत्रसंहिता 9:2

तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा, मी तुझ्या नामाचा महिमा गातो.

स्तोत्रसंहिता 32:11

चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा. शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!

स्तोत्रसंहिता 35:9

नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन. त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन.

स्तोत्रसंहिता 63:5

चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.

स्तोत्रसंहिता 77:12

तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला. मी त्या गोष्टींबद्दल विचार केला.

स्तोत्रसंहिता 105:3

परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा.

स्तोत्रसंहिता 119:15

मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन. मी तुझी जीवन जगण्याची पध्दत आचरेन.

स्तोत्रसंहिता 119:111

परमेश्वरा, मी सदैव तुझ्या कराराप्रमाणे वागेन त्यामुळे मला खूप आनंद होतो.

स्तोत्रसंहिता 119:127

परमेश्वरा, शुध्दातल्या शुध्द सोन्यापेक्षा मला तुझ्या आज्ञा आवडतात.

स्तोत्रसंहिता 119:167

मी तुझ्या कराराप्रमाणे वागलो, परमेश्वरा, मला तुझे नियम खूप आवडतात.

स्तोत्रसंहिता 139:17

तुझे विचार मला महत्वाचे आहेत, देवा तुला खूप माहिती आहे.

नीतिसूत्रे 24:14

त्याचप्रमाणे शहाणपण तुमच्या आत्म्यासाठी चांगले असते. तुमच्या जवळ शहाणपण असेल तर तुमच्या जवळ आशाही असेल आणि तुमची आशा कधीही मावळणार नाही.

हबक्कूक 3:17

कदाचित् अंजिराच्या झाडांना अंजिरे लागणार नाहीत. वेलीना द्राक्षे लागणार नाहीत. जैतूनाच्या झाडांना फळे लागणार नाहीत. शेतांत धान्य उगवणार नाही, गोठ्यात शेळ्या मेंढ्या, गाईगुरे राहणार नाहीत,

हबक्कूक 3:18

तरी मी परमेश्वराठयी आनंद करीन. माझ्या तारणहाराजवळ, देवाजवळ मला सुख मिळेल.

लूक 1:47

“माझा आत्मा प्रभूची स्तुति करतो;माझा आत्मा माझ्या तारणाऱ्या देवामध्ये आनंद करतो.

फिलिप्पैकरांस 4:4

प्रभूमध्ये नेहमी आनंद करा.

प्रकटीकरण 10:10

मी ती लहान गुंडाळी देवदूताच्याहातून घेतली व खाऊन टाकली. माझ्या तोंडात मला ती मदासारखी गोड वाटली, पण जेव्हा ती मी खाल्ली, तेव्हा माझेपोट कडवट झाले.

Interlinear

Choose Theme