परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”
Cross references
इस्राएलच्या परमेश्वर देवाचे अनादी काळापासून स्तवन केले जाते. त्याची स्तुतिस्तोत्रे अखंड गायिली जावोत.सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले. ते असे:“हे परमेश्वर, इस्राएलच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस.
इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो. तो नेहमी होता आणि नेहमी राहील आमेन आमेन.
परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा. फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
परमेश्वराला सदैव दुवा द्या. आमेन आमेन.
देवाने असे का केले? त्याच्या माणसांनी त्याचे नियम पाळावे म्हणून त्यांनी त्याची शिकवण काळजीपूर्वक आचरावी म्हणून, परमेश्वराची स्तुती करा.
कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो फक्त ऐकणारा सामान्य तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्याला कळत नाही.