मी माझ्या अंथरुणावर स्वच्छ चादर टाकली आहे. त्या मिसर देशातल्या सुंदर चादरी आहेत.
Cross references
मिसर आणि क्यू येथून शलमोन घोडे आणवत असे. त्याचे व्यापारी क्यूमध्ये ते खरेदी करत आणि तेथून ते इस्राएल मध्ये आणत.
ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते. चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते.
प्रियकरा, तू सुध्दा सुस्वरुप आहेस आणि मोहक आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
ही बघ, शलमोनाची प्रवासाला जाण्याची खुर्ची! साठ सैनिक, इस्राएलचे शक्तिमान सैनिक तिचे रक्षण करीत आहेत.
विणकर फार दु:खी होतील. कारण त्यांना कापड तयार करण्यासाठी आंबाडी लागते. पण नदी कोरडी पडल्यामुळे त्यात आंबाडी होणार नाही.
तुझ्या शिडासाठी त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले. ते शीड तुझे निशाण होते. तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते. ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.
म्हणून मी तिला दु:खाच्या बिछान्यावर खिळवीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचाराचे पाप करतात त्यांना भयंकर दु:खभोगावयास लावीन. जर ती तिच्या मार्गापासून पश्र्चात्ताप पावली नाही