Home Bibles यहेज्केल 27:7 · मराठी बायबल
यहेज्केल 27:7 · मराठी बायबल

तुझ्या शिडासाठी त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले. ते शीड तुझे निशाण होते. तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते. ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.

Cross references

उत्पत्ति 10:4

यावानाचे मुलगे; अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम.

निर्गम 25:4

निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;

1 राजे 10:28

मिसर आणि क्यू येथून शलमोन घोडे आणवत असे. त्याचे व्यापारी क्यूमध्ये ते खरेदी करत आणि तेथून ते इस्राएल मध्ये आणत.

1 इतिहास 1:7

यावानचे मुलगे: अलीसा, तार्शीश, कित्तीम, रोदानीम

नीतिसूत्रे 7:16

मी माझ्या अंथरुणावर स्वच्छ चादर टाकली आहे. त्या मिसर देशातल्या सुंदर चादरी आहेत.

यशया 19:9

विणकर फार दु:खी होतील. कारण त्यांना कापड तयार करण्यासाठी आंबाडी लागते. पण नदी कोरडी पडल्यामुळे त्यात आंबाडी होणार नाही.

यिर्मया 10:9

ते लोक तार्शिशहून आणलेल्या चांदीचा आणि उफाजहून आणलेल्या सोन्याचा वापर करुन पुतळे बनवितात. ह्या मूर्ती सुतार आणि सोनार घडवितातत्या मूर्तीवर ते निळ्या आणि जांभळ्या रंगाचे कपडे चढवितात ‘शहाणे लोक’ असे ‘देव’ तयार करतात.

Interlinear

Choose Theme