Home Bibles नीतिसूत्रे 6:16 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 6:16 · मराठी बायबल

परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो.

Cross references

अनुवाद 18:10

आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.

अनुवाद 23:18

पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षात घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.

अनुवाद 25:16

खोट्या वजनमापांनी लोकांची फसवणूक करणाऱ्यांचा, अनुचित वागणाऱ्यांचा तुमचा परमेश्वर देव तिरस्कार करतो.

2 राजे 21:16

शिवाय मनश्शेने अनेक निरपराध्यांची हत्या केली. संपूर्ण यरुशलेम त्याने रक्तलांछित केले. यहूद्यांना त्याने जी पापे करायला लावली ती वेगळीच. परमेश्वराने जे करु नका म्हणून सांगितले ते मनश्शेने यहूदाला करायला लावले.”‘

ईयोब 5:19

देव तुला सहा प्रकारच्या संकटांतून तारील. आणि सात संकटांत तुला काहीही अपाय होणार नाही.

स्तोत्रसंहिता 5:7

परमेश्वरा, मी तुझ्या विपुल कृपेमुळे तुझ्या मंदिरात येईन. मी पवित्र मंदिरात भीतीपोटी आणि तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नतमस्तक होईन.

स्तोत्रसंहिता 11:5

परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो. दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.

नीतिसूत्रे 3:32

का? कारण परमेश्वर वाईट लोकांचा तिरस्कार करतो. परंतु परमेश्वर चांगल्या लोकांचा पाठीराखा असतो.

नीतिसूत्रे 8:13

जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.

नीतिसूत्रे 11:1

काही लोक नीट वजन न करणारा तराजू वापरतात. ते लोकांना फसविण्यासाठी असा तराजू वापरतात. परमेश्वराला असले खोटे तराजू आवडत नाही. पण खरा असलेल्या तराजूमुळे परमेश्वराला आनंद होतो.

नीतिसूत्रे 11:20

जे लोक आनंदाने दुष्टपणा करतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो. पण जे लोक योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याबद्दल परमेश्वर आनंदी असतो.

नीतिसूत्रे 12:22

परमेश्वर खोटं बोलणाऱ्यांचा तिरस्कार करतो. पण परमेश्वर खरे बोलणाऱ्या लोकांबरोबर आनंदी असतो.

नीतिसूत्रे 15:8

दुष्ट माणसे ज्या गोष्टी अर्पण करतात त्या परमेश्वराला आवडत नाहीत. पण परमेश्वर चांगल्या माणसाची प्रार्थना ऐकून आनंदी होतो.

नीतिसूत्रे 17:15

दोषी नसणाऱ्याला शिक्षा करणे आणि दोषी असणाऱ्यांचे समर्थन करणे या दोन गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत.

नीतिसूत्रे 20:10

जे लोक चुकीची वजने आणि तराजू वापरुन लोकांना फसवतात त्यांचा परमेश्वर तिरस्कार करतो.

नीतिसूत्रे 20:23

काही लोक फसवी वजने आणि मापे वापरतात. ते त्याचा उपयोग लोकांना फसवण्यासाठी करतात. ते परमेश्वराला आवडत नाही. त्यामुळे त्याला आनंद होत नाही.

नीतिसूत्रे 21:4

गर्विष्ठ दृष्टी व गर्विष्ठ विचार पापरुप आहेत. माणूस पातकी आहे हेच ते दर्शवितात.

नीतिसूत्रे 30:18

तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही.

नीतिसूत्रे 30:21

तीन गोष्टी पृथ्वीवर संकटे आणतात, खरे म्हणजे चार गोष्टी, ज्यांचा भार पृथ्वी पेलू शकत नाही.

नीतिसूत्रे 30:24

पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत.

नीतिसूत्रे 30:29

तीन गोष्टी चालताना फार महत्वाच्या वाटतात, खरे म्हणजे चार.

आमोस 1:3

परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “दिमीष्कच्या लोकांनी पुष्कळ अपराध केल्यामुळे मी त्यांनी खात्रीने शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादला धान्य मळण्याच्या लोखंडी अवजाराने मारले.

आमोस 1:6

परमेशवर असे म्हणाला, “मी गज्जाच्या लोकांना नक्कीच शिक्षा करीन कारण त्यांनी फार अपराध केले आहेत. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्रावर ताबा मिळवून लोकांना गुलाम म्हणून अदोमला पाठविले.

आमोस 1:9

परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “सारेच्या पुष्कळ अपराधांबद्दल मी त्यांना नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्र आपल्या ताब्यात घेऊन लोकांना गुलाम करून अदोमला पाठविले. त्यांच्या भावांबरोबर (इस्राएलबरोबर) केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही.

आमोस 1:11

परमेश्वर असे सांगतो, “अदोमच्या लोकांनी खूप अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच का? कारण अदोमने तलवारीने त्याच्या भावाचा (इस्राएलचा) पाठलाग केला. अदोमला अजिबात दया आली नाही अदोमचा राग कायम राहिला. तो हिंस्त्र पशूप्रमाणे इस्राएलला फाडत राहिला

आमोस 2:1

परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “मवाबच्या लोकांनी पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच. का? कारण त्यांनी अदोमच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला.

आमोस 2:4

परमेश्वर असे म्हणतो, “यहूदाने पुष्कळ अपराध केले असल्यामुळे मी यहूदाला शिक्षा करीन. का? कारण त्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्यास नकार दिला. त्यांनी परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांच्या पूर्वजांनी असत्यावर विश्वास ठेवला. यहूदाच्या लोकांनी परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून देण्यास हे असत्यच कारणीभूत झाले.

आमोस 2:6

परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “इस्राएलने पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्याला शिक्षा करणारच. का? कारण इस्राएल लोकांना विकले. त्यांनी गरिबांना जोड्याच्या किंमतीला विकले.

प्रकटीकरण 21:27

जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही.अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यालोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.

Interlinear

Choose Theme