Home Bibles नीतिसूत्रे 3:25 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 3:25 · मराठी बायबल

अचानक येणाऱ्या संकटास घाबरु नकोस. परमेश्वर तुला शक्ती देईन. आणि वाईट लोक तुला काय करतील ह्याला घाबरु नको. परमेश्वर तुझे रक्षण करील व तुझा जीव वाचवील.

Cross references

ईयोब 5:21

लोक त्यांच्या धारदार जिभेने तुझ्याबद्दल वाटेल ते बोलतील परंतु देव तुझे रक्षण करेल. जेव्हा काही वाईट घडेल तेव्हा तुला घाबरुन जाण्याची गरज नाही.

ईयोब 11:13

“पण ईयोब फक्त देवाची सेवा करण्यासाठी तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी त्याच्या दिशेने उचलले पाहिजेस.

स्तोत्रसंहिता 27:1

परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही.

स्तोत्रसंहिता 46:1

देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो.

स्तोत्रसंहिता 73:19

अचानक संकटे येऊ शकतात आणि नंतर त्या गार्विष्ठ माणसांचा नाश होतो. भयंकर गोष्टी घडू शकतात आणि मग त्यांचा सर्वनाश होतो.

स्तोत्रसंहिता 91:5

रात्री तुम्हाला घाबरण्यासारखे काहीही नसेल आणि तुम्हाला दिवसाही शत्रूंच्या बाणांची भीती वाटणार नाही.

स्तोत्रसंहिता 112:7

त्याला वाईट बातमीची भीती वाटणार नाही. त्या माणसाचा विश्वास दृढ असेल कारण त्याचा परमेश्वरावर विश्वास आहे.

नीतिसूत्रे 1:27

मोठ्या वादळांप्रमाणे तुमच्यावर मोठी संकटे येतील. जोरदार वाऱ्याप्रमाणे तुमच्यावर समस्या आघात करतील. तुमची संकटे आणि दु:ख तुम्हाला खूप मोठ्या ओइयासारखे वाटेल.

यशया 8:12

“दुसरे त्यांच्याविरूध्द कट करीत आहेत, असे ते म्हणत आहेत. तू त्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस, ज्या गोष्टींना हे लोक घाबरतात, त्या गोष्टींना घाबरू नकोस. त्या गोष्टींची मुळीच भीती बाळगू नकोस.”

यशया 41:10

काळजी करू नकोस मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस. मी तुझा देव आहे. मी तुला मदत करीन. मी माझ्या चांगलुपणाच्या उजव्या हाताने तुला आधार देईन.

यशया 54:14

चांगुलपणाच्या पायावर तुझी उभारणी होईल. म्हणून क्रौर्य आणि भय यांपासून तू सुरक्षित असशील. तुला कशाची भीती बाळगण्याचे कारण पडणार नाही. कशापासूनही तुला इजा होणार नाही.

दानीएल 3:17

जर तू आम्हाला भट्टीत टाकलेस, तर आम्ही उपासना करीत असलेला देव आमचे रक्षण करू शकतो आणि त्याची इच्छा असल्यास तो तुझ्यापासून आमचा बचावही करू शकतो.

मीखा 4:4

प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबविणार नाही. का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.

जखऱ्या 9:8

माझ्या देशातून मी शत्रू - सैन्याला जाऊ देणार नाही. शत्रूंकडून माझ्या लोकांना इजा पोहचवू देणार नाही. कारण माझ्या लोकांनी पूर्वी किती यातना भोगल्या आहेत ते मी स्वत: पाहिले आहे.”

मत्तय 8:24

अचानक, समुद्रात इतके मोठे वादळ झाले की, नाव लाटांमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली. आणि येशू तर नावेत झोपला होता.

मत्तय 24:6

तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही.

मत्तय 24:15

तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.

मार्क 4:40

मग तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजुनही कसा विश्वास नाही?”

लूक 21:9

जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका. कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.”

लूक 21:18

परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही.

योहान 14:1

‘तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.

1 पेत्र 3:14

जे योग्य ते करुनसुद्धा जर तुम्हांला दु:ख सहन करावे लागते, तर तुम्ही धन्य आहात. म्हणून “त्या लोकांची भीति बाळगू नका किंवा गर्भगळित होऊ नका”

Interlinear

Choose Theme