Home Bibles गणना 28:26 · मराठी बायबल
गणना 28:26 · मराठी बायबल

“पहिल्या फळाच्या हंगामाच्या सणाला (सप्ताहांचा सण) परमेश्वराला धान्यार्पणे देण्यासाठी नवीन धान्य वापरा. त्यावेळी तुम्ही एक खास सभाही बोलवा त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही.

Cross references

निर्गम 12:16

या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी स्वयंपाकाच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.

निर्गम 23:16

“दुसरी सुट्टी साधारणपणे उन्हाव्व्याच्या सुरवातीस असेल; यावेळी तुम्ही शेतात पेरलेल्या पहिल्या पिकाच्या कापणीचा किंवा हंगामाचा सण पाळावा.तिसरी सुट्टी ‘मंडपाचा सणाच्या’ वेळी असेल हा सण वर्षाच्या अखेरीस म्हणजे सुगीच्या दिवसात जेव्हा तुम्ही शेतातील धान्य गोळा करता तेव्हा पाळावा.

निर्गम 34:22

“तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळ. गव्हाच्या पिकाचे पहिले धान्य या सणासाठी वापर. आणि वर्ष परिवर्तनाच्या काळात सुगीचा सण पाळ.

लेवीय 23:8

सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्रीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी काही काम करु नये:”

लेवीय 23:10

“इस्राएल लोकांना सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;

लेवीय 23:15

“तुम्ही शब्बाथ दिवसाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी-रविवारी सकाळी जेव्हा ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून सात शब्बाथ दिवस मोजावे;

लेवीय 23:16

सातव्या शब्बाथ दिवसानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या रविवारी म्हणजे पन्नासाव्या दिवशी तुम्ही परमेश्वराकरिता नवे अन्नार्पण आणावे.

गणना 28:18

या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही कुठलेही काम करायचे नाही.

अनुवाद 16:9

“पीक काढल्यापासून सात आठवडे मोजा.

अनुवाद 16:10

मग, आपल्या इच्छेनुसार एखादी विशेष भेटवस्तू आणून आपला देव परमेश्वर याच्यासाठी सप्ताहांचा सण साजरा करा. आपल्याला परमेश्वर देवाच्या कृपेने किती मिळाले याचा अंदाज घेऊन किती द्यायचे ते ठरवा.

प्रेषितांचीं कृत्यें 2:1

पन्रासावाचादिवस आला, तेव्हा सर्व प्रेषित एका ठिकाणी एकत्र होते.

1 करिंथकरांस 15:20

परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे.

याकोब 1:18

सत्याच्या संदेशाद्वारे आपण त्याची मुले व्हावे ही त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली निवड केली आहे. पित्याने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींमध्ये आपण “प्रथम फळ” व्हावे यासाठी त्याने असे केले.

Interlinear

Choose Theme