Home Bibles गणना 28:25 · मराठी बायबल
गणना 28:25 · मराठी बायबल

नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही एक खास सभा घ्याल. तुम्ही त्या दिवशी काहीही काम करणार नाही.

Cross references

निर्गम 12:16

या सणाच्या पहिल्या व शेवटल्या म्हणजे सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; ह्या दोन्ही दिवशी स्वयंपाकाच्या कामाशिवाय इतर कोणतेही काम करु नये.

निर्गम 13:6

“या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी मोठी मेजवानी करून तुम्ही हा सण पाळावा;

लेवीय 23:3

“सहा दिवस कामकाज करावे, परंतु सातवा दिवस, विसाव्याचा शब्बाथ दिवस व पवित्र मेळ्याचा दिवस होय; ह्या दिवशी तुम्ही कसलेही काम करु नये; तुमच्या सर्व घराघरात हा परमेश्वराचा शब्बाथ असावा.

लेवीय 23:8

सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्रीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी काही काम करु नये:”

लेवीय 23:21

त्याच दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा; तुम्ही कोणतेही काम करु नये; तुमच्या प्रत्येक घरासाठी हा तुम्हाला पिढ्यान्पिढ्या निंरंतरचा नियम होय.

लेवीय 23:25

तुम्ही कोणतही काम करु नये; तर तुम्ही परमेश्वराला अर्पण अर्पावे.”

लेवीय 23:35

पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी कसलेही काम करु नये.

गणना 28:18

या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही कुठलेही काम करायचे नाही.

गणना 28:26

“पहिल्या फळाच्या हंगामाच्या सणाला (सप्ताहांचा सण) परमेश्वराला धान्यार्पणे देण्यासाठी नवीन धान्य वापरा. त्यावेळी तुम्ही एक खास सभाही बोलवा त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही.

गणना 29:1

“सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी खास सभा असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करणार नाही. हा कर्णावाजवण्याचा दिवस आहे.

गणना 29:12

“सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एक खास सभा असेल. तो मंडपाचा सण असेल. त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही आणि परमेश्वरासाठी सात दिवसांची खास सुट्टी साजरी करायची.

गणना 29:35

“या सुट्ठीच्या आठव्या दिवशी तुमच्यासाठी एक खास सभा भरवावी. त्या दिवशी तुम्ही कोणतेही काम करू नये.

Interlinear

Choose Theme