Home Bibles गणना 28:2 · मराठी बायबल
गणना 28:2 · मराठी बायबल

इस्राएल लोकांना ही आज्ञा दे. योग्यवेळी धान्यार्पणे आणि बळी न विसरता मला अर्पण करायला त्यांना सांग. अग्नी बरोबर देण्याची ती अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो.

Cross references

उत्पत्ति 8:21

परमेश्वराने त्या अर्पणाचा सुवास घेतला आणि त्याने त्याला आनंद झाला; परमेश्वर स्वत:स म्हणाला, “मानवास शिक्षा करण्याकरिता मी पुन्हा कधीही भूमिला असा शाप देणार नाही; आपल्या लहानपणापासूनच मानव दुष्ट आहे; तेव्हा येथून पुढे कधीही मी पृथ्वीवरुन सर्वसजीव सृष्टीचा नाश करणार नाही पुन्हा;

निर्गम 23:15

पहिली सुट्टी बेखमीर भाकरीच्या सणाची होय. मी आधी आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही हा सण पाळावा; त्यात सात दिवस खमीर न घातलेली भाकर तुम्ही खावी; हा सण तुम्ही अबीब महिन्यात पाळावा, कारण याच महिन्यात तुम्ही मिसरमधून बाहेर निघून आला; या सणाच्या वेळी प्रत्येक माणसाने माझ्यासाठी अर्पण आणावे.

निर्गम 29:18

मग मेंढ्याच्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे परमेश्वराकरिता विशेष होमार्पण होय; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; त्यामुळे परमेश्वराला संतोष होईल.

लेवीय 1:9

त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी, मग याजकाने सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी आहे; त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.

लेवीय 1:13

त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; त्याच्यामुळे परमेश्वराला संतोष होतो.

लेवीय 1:17

त्याने तो पक्षी पंखाच्या तेथून फाडावा, परंतु त्याने त्याचे दोन भाग वेगळे करु नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.

लेवीय 3:11

मग याजकाने त्या सर्वाचा वेदीवर होम करावा; हे शांत्यर्पण अग्नीद्वारे परमेश्वराला केलेले अर्पण आहे, परंतु हे लोकांसाठी अन्नसुद्धा होईल.

लेवीय 21:6

त्यांनी आपल्या देवासाठी पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नांवाचा मान राखावा. त्याचे भय धरावे. आणि त्याच्या नांवाला काळिमा लावू नये; ते अग्नीद्वारे परमेश्वराला अर्पण म्हणजे अन्नार्पण अर्पित असतात म्हणून त्यांनी अवश्य पवित्र राहावे.

लेवीय 21:8

याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्याला पवित्र मानावे; कारण तो पवित्र वस्तू देवाकडे घेऊन जातो! तो देवाला पवित्र अन्नार्पण करतो आणि मी पवित्र आहे.

गणना 9:2

“इस्राएल लोकांना ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग.

गणना 9:7

ते लोक मोशेला म्हणले, “एका माणसाच्या प्रेताला आमचा स्पर्श झाला व आम्ही अशुद्ध झालो. त्यामुळे ठरलेल्या वेळी परमेश्वराला अर्पणे करण्यास याजकांनी आम्हाला बंदी केली. तेव्हा इतर इस्राएल लोकाबरोबर आम्हाला अर्पणे करिता येत नाहीत!”

गणना 9:13

परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही व तो सण पाळू शकतो तर अशा माणसाने वल्हांडण सण ठरलेल्या वेळी पाळला नाही तर त्याला आपल्या लोकातून काढून टाकावे. तो अपराधी आहे म्हणून त्याला अवश्य शिक्षा व्हावी! कारण त्याने योग्य वेळी परमेश्वराला दान दिले नाही.

गणना 15:3

तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्या. त्याच्या सुवासाने परमेश्वरास आनंद होईल. तुम्ही तुमच्या गायी, मेंढ्या आणि बकऱ्या यांचा उपयोग होमार्पण यज्ञ नवस स्वखुशीने द्यावयाच्या देणाग्या किंवा नेहमीच्या यज्ञातला भाग म्हणून उपयोग कराल.

गणना 15:7

आणि तुम्ही 1/4 कप द्राक्षारस पेयार्पण केला पाहिजे. त्याच्या सुवास परमेश्वराला आनंदित करेल.

गणना 15:24

तेव्हा जर तुम्ही चूक केलीत आणि या आज्ञांचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल? जर इस्राएलच्या सर्व लोकांनी मिळून चूक केली तर त्यानी सर्वांनी मिळून एक गोऱ्हा परमेश्वराला होमार्पण केला पाहिजे. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करील. गोऱ्ह्याबरोबर धान्यार्पण आणि पेयार्पण करायला पाहिजे. तुम्ही पापार्पणासाठी बकराही अर्पण केला पाहिजे.

गणना 29:39

“या खास सुट्टीत तुम्ही होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणाची अर्पणे म्हणून आणली पाहिजेत. ही सर्व अर्पणे तुम्ही परमेश्वराला करावीत. ही सर्व अर्पणे तुम्हाला परमेश्वराला खास भेट द्यायची असेल किंवा परमेश्वराला काही खास वचन दिले आहे म्हणून द्यावयाच्या अर्पणाव्यतिरिक्त असतील.”

1 इतिहास 23:31

शब्बाथच्या दिवशी, नवचंद्र दर्शन आणि सणावाराला देवाची होमार्पणे ते तयार करत. नित्य आराधनाही त्यांच्याकडेच होती. एका वेळी किती लेवींनी हे करायचे याचे नियम घालून दिलेले होते.

2 इतिहास 23:18

यहोयादाने मग परमेश्वराच्या मंदिरातील याजकांची नेमणूक केली. हे याजक लेवी होते आणि दावीदाने त्यांना मंदिराचे मुखत्यारपद दिले होते. मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे परमेश्वराला होमबली अर्पण करणे, हे त्यांचे काम होते. दावीदाच्या आज्ञेनुसार आनंदाने गायन करत त्यांनी होमबली अर्पण केले

2 इतिहास 31:3

यज्ञात अर्पण करण्यासाठी म्हणून हिज्कीयाने आपल्या पशुधनातील काही पशू दिले. सकाळ संध्याकाळच्या दैनिक होमार्पणांखातर त्यांचा विनियोग करण्यात आला. शब्बाथ, नवचंद्रदर्शनी व इतर नैमित्तिक कार्ये या दिवशीही होमार्पणे होत असत. हे परमेश्वराच्या नियमशास्त्रानुसार होत असे.

एज्रा 3:2

योसादाकचा मुलगा येशूवा याने शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि इतर बरोबर असलेल्या लोकांच्या सहकार्याने, होमार्पणे वाहण्यासाठी इस्राएलच्या देवाची वेदी बांधली. देवाचा एकनिष्ठ सेवक मोशे याच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तिचे बांधकाम झाले.

नहेम्या 10:34

“दरवर्षी नेमलेल्या वेळी मंदिरात लाकडाची अर्पणे आणावी म्हणून आम्ही सर्वांनी याजक, लेवी व सर्व लोक यांनी चिठ्ठ्या टाकल्या आहेत. त्या चिठ्ठ्यांनुसार प्रत्येक कुटुंबाने परमेश्वर देवाच्या वेदीवर जाळण्यासाठी लाकूड आणायचे आहे. नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे आपल्याला हे करायलाच हवे.

स्तोत्रसंहिता 81:3

अमावास्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. याचवेळी आपला सण सुरु होतो.

यहेज्केल 16:19

मी तुला भाकरी, मध व तेल दिले. तेही तू त्या मूर्तींना दिलेस. तू खोट्या देवांनी प्रसन्न व्हावे म्हणून सुगांधित द्रव्ये म्हणून ह्या सर्व गोष्टी त्यांना अर्पण केल्यास. त्या खोट्या देवांबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

यहेज्केल 20:41

मगच तुम्ही अर्पण केलेल्या वस्तूंच्या सुंगधाने मी प्रसन्न होईन. मी तुम्हाला परत आणीन तेव्हाच असे घडेल. मी तुम्हाला पुष्कळ देशांत विखरुन टाकले. पण मी तुम्हाला एकत्र करुन माझे खास लोक म्हणून पुन्हा तुमची निवड करीन. सर्व राष्ट्रांसमक्ष मी हे करीन.

यहेज्केल 45:17

पण विशेष पवित्र दिवसांसाठी राजाने आवश्यक त्या गोष्टी दिल्या पाहिजेत. सण, अमावस्या, शब्बाथ ह्या दिवसांसाठी आणि इस्राएलच्या खास सणांसाठी राजाने होमार्पणे, धान्यार्पणे व पेयार्पणे ह्यांची सोय केली पाहिजे. इस्राएलच्या शुद्धतेसाठी असलेली पापार्पणे, धान्यार्पणे, होमार्पणे व शांत्यर्पणेसुद्धा राजाने दिली पाहिजेत.”

मलाखी 1:7

परमेश्वर म्हणाला, “तुम्ही अशुध्द भाकरी माझ्या वेदीजवळ आणता.”पण तुम्ही विचारता “ती कशामुळे ती भाकरी अशुध्द झाली?”परमेश्वर म्हणाला, “माझ्या मेजाचा (वेदीचा) तुम्ही आदर करीत नाही.

मलाखी 1:12

“पण तुम्ही लोक माझ्या नावाचा मान राखीत नाही असे दिसते. ‘परमेश्वराचा मेज (वेदी) अशुध्द आहे’ असे तुम्ही म्हणता.

2 करिंथकरांस 2:15

कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत.

इफिसकरांस 5:2

आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.

फिलिप्पैकरांस 4:18

माझ्या गरजेपुरते माझ्याजवळ सर्व काही आहे आणि ते विपुल आहे. एपफ्रदीताच्या करवी ज्या गोष्टी तुम्ही पाठविल्या त्या मिळाल्यामुळे गरजेपेक्षा अधिक माझ्याजवळ आहे. ते मधुर सुगंधी अर्पण स्वीकारण्यास योग्य असा यज्ञ जो देवाला संतोष देणार असा आहे.

Interlinear

Choose Theme