Home Bibles उत्पत्ति 8:21 · मराठी बायबल
उत्पत्ति 8:21 · मराठी बायबल

परमेश्वराने त्या अर्पणाचा सुवास घेतला आणि त्याने त्याला आनंद झाला; परमेश्वर स्वत:स म्हणाला, “मानवास शिक्षा करण्याकरिता मी पुन्हा कधीही भूमिला असा शाप देणार नाही; आपल्या लहानपणापासूनच मानव दुष्ट आहे; तेव्हा येथून पुढे कधीही मी पृथ्वीवरुन सर्वसजीव सृष्टीचा नाश करणार नाही पुन्हा;

Cross references

उत्पत्ति 3:17

नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला,“त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस. तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;

उत्पत्ति 4:12

पूर्वी तू जमिनीची मशागत केलीस आणि तिने तुला चांगले पीक दिले. पण आता तू मशागत करशील तरी ती भूमी तुला पीक देणार नाही. तू पृथ्वीवर एका ठिकाणी घर करुन राहणार नाहीस तर तू भटकत राहशील व परागंदा होशील.”

उत्पत्ति 5:29

त्याने त्याचे नाव नोहा (म्हणजे विसावा) असे ठेवले. लामेख म्हाणाला, “देवाने भूमिला शाप दिल्यामुळे आपल्याला शेतकरी म्हणून खूप काष्ट करावे लागतात; परंतु नोहा आपल्याला विसावा देईल.”

उत्पत्ति 6:5

परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत; त्यांचे विचार नेहमी वाईट असतात.

उत्पत्ति 6:17

“मी सांगतो ते समजून घे. मी पृथ्वीवर जलप्रलय आणीन. मी पृथ्वीवरील सर्वलोक आणि सर्व सजीव प्राण्यांना नष्ट करीन.

उत्पत्ति 9:11

तो करार असा: पृथ्वीवरील सर्वप्राणीमात्र जलप्रलयामुळे नष्ट झाले पण येथून पुढे तसे कधीच होणार नाही, व सर्व सजीव सृष्टीचा नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी येणार नाहीं.”

उत्पत्ति 9:15

जेव्हा मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, ह्या कराराप्रमाणे जलप्रलय पृथ्वीवरील जीवनांचा पुन्हा कधीही नाश करणार नाही.

निर्गम 29:18

मग मेंढ्याच्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे परमेश्वराकरिता विशेष होमार्पण होय; हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय; त्यामुळे परमेश्वराला संतोष होईल.

निर्गम 29:25

मग त्या सर्व वस्तू अहरोन व त्याच्या मुलांच्या हातातून घेऊन मेंढ्यासह परमेश्वरासमोर व वेदीवर त्यांचा होम करावा; ते परमेश्वराला अर्पिलेले सुवासिक हव्य होय.

लेवीय 1:9

त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी, मग याजकाने सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी आहे; त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.

लेवीय 1:13

त्याचे पाय व आंतडी पाण्याने धुवावी; मग याजकाने त्या सर्व भागांचा वेदीवर होम करावा; हे होमार्पण परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय; त्याच्यामुळे परमेश्वराला संतोष होतो.

लेवीय 1:17

त्याने तो पक्षी पंखाच्या तेथून फाडावा, परंतु त्याने त्याचे दोन भाग वेगळे करु नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. त्याच्या सुवासामुळे परमेश्वराला आनंद होतो.

लेवीय 26:31

मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक अर्पणांचा वास घेणे मी बंद करीन.

1 शमुवेल 26:19

राजेसाहेब, माझे ऐका. तुमच्या माझ्यावरील क्रोधाचे कारण परमेश्वर असेल तर तो माझ्या अर्पणाचा स्वीकार करील. पण माणसांनी तुम्हाला माझ्याविरुद्ध भडकवले असेल तर परमेश्वर त्यांचा सत्यानाश करो. या लोकांमुळेच मला परमेश्वराने दिलेल्या भूमीतून काढता पाय घ्यावा लागला. “दुसऱ्या कुठल्या परमेश्वराची उपासना कर, इथून चालता हो” असे यांनीच मला सांगितले.

ईयोब 14:4

“परंतु एखाद्या घाणेरड्या वस्तूचे स्वच्छ वस्तूशी काय साम्य असू शकते काहीच नाही.

ईयोब 15:14

“मनुष्य कधीही निष्कलंक असू शकत नाही. मनुष्यप्राणी देवापेक्षा अधिक बरोबर असू शकत नाही.

स्तोत्रसंहिता 51:5

मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.

स्तोत्रसंहिता 58:3

त्या वाईट लोकांनी जन्मल्याबरोबर दुष्कर्म करायला सुरुवात केली. ते जन्मापासूनच खोटारडे होते.

स्तोत्रसंहिता 58:4

ते सापासारखेच भयंकर आहेत आणि नागाप्रमाणे त्यांना ऐकू येत नाही. ते सत्य ऐकायला नकार देतात.

नीतिसूत्रे 20:9

कुठलाही माणूस आपण प्रयत्नांची पराकाष्टा केली असे खरोखरच म्हणू शकेल का? मी पाप केले नाही असे कुणी खरोखर सांगू शकेल का? नाही.

गीतरत्न 4:10

माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे, प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे.

यशया 47:12

“जादूटोणा आणि चेटूक शिकण्यासाठी तू आयुष्यभर मेहनत केलीस. तेव्हा आता त्याचा उपयोग करायला सुरवात कर. कदाचित् त्या युक्त्या तुझ्या उपयोगी पडतील; कदाचित् तू कोणाला घाबरवू शकशील.

यशया 47:15

“तू ज्या गोष्टींसाठी मेहनत घेतलीस त्या गोष्टींच्या बाबतीत असेच होईल. तू आयुष्यभर ज्यांच्याबरोबर व्यापार केलास ते सर्व तुला सोडून जातील. प्रत्येक जण आपापल्या मार्गाने जाईल. तुला वाचवायला कोणीही राहणार नाही.”

यशया 48:8

“पण जरी मी तुम्हाला भविष्यात घडणार आहे हे सांगितले तरी ते ऐकून घ्यायला तुम्ही अजूनही नकार द्याल. तुम्ही काहीही शिकणार नाही. मी सांगितलेली कोणतीही गोष्ट तुम्ही केव्हाही ऐकली नाही. तुम्ही माझ्याविरूध्द जाल हे मला सुरवातीपासूनच माहीत होते. तुम्ही जन्मल्यापासून माझ्याविरूध्द बंड पुकारले आहे.

यशया 53:6

पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वत:च्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो.

यशया 54:9

देव म्हणतो, “नोहाच्या काळात प्रलय आणून मी जगाला शिक्षा केली होती ते आठव. पण, पुन्हा प्रलय घडवून जग नष्ट करणार नाही असे वचन मी नोहाला दिले होते. त्याचप्रमाणे मी आता तुला वचन देतो की मी तुझ्यावर कधी रागावणार नाही आणि तुझी खरडपट्टी ही काढणार नाही.”

यशया 65:6

“हे बघा, हा हिशेब चुकता केलाच पाहिजे. हा हिशेब, तुम्ही पापे करून अपराध केल्याचे दाखवितो. हा हिशेब चुकता केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि तुम्हाला शिक्षा करून मी हा हिशेब चुकता करीन.

यिर्मया 8:6

मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्र्चाताप वाटत नाही. त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचा ते विचार करीत नाहीत. विचार केल्याशिवाय ते गोष्टी करतात. युद्धात दौडणाऱ्या घोड्यांसारखे ते आहेत.

यिर्मया 17:9

“माणसाचे मन फार कपटी असते. त्याच्यावर काही औषध नाही. म्हणूनच कोणालाही मनाचे खरे आकलन होत नाही.

यिर्मया 18:12

पण यहूदातील लोक म्हणतील, ‘असा प्रयत्न करुन काही भले होणार नाही. आम्हाला पाहिजे तेच आम्ही करीत राहू आमच्यातील प्रत्येकाच्या हट्ठी आणि दुष्ट मनाला वाटेल तेच आम्ही करु.”

यहेज्केल 20:41

मगच तुम्ही अर्पण केलेल्या वस्तूंच्या सुंगधाने मी प्रसन्न होईन. मी तुम्हाला परत आणीन तेव्हाच असे घडेल. मी तुम्हाला पुष्कळ देशांत विखरुन टाकले. पण मी तुम्हाला एकत्र करुन माझे खास लोक म्हणून पुन्हा तुमची निवड करीन. सर्व राष्ट्रांसमक्ष मी हे करीन.

आमोस 5:21

“मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक-सभा मला आवडत नाहीत.

मत्तय 15:19

कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंत:करणातून बाहेर निघतात.

योहान 3:6

मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो. परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो.

रोमकरांस 1:21

कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंत;करणे अंधकारमय झाली.

रोमकरांस 3:23

सर्वानी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.

रोमकरांस 8:7

मानवी स्वभावाचे अधिकार असलेले पापी मन म्हणजे देवाबरोबर वैर आहे. कारण ते देवाच्या नियमाच्या आधीन होत नाही, व त्याला आधीन होताही येत नाही.

2 करिंथकरांस 2:15

कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत.

इफिसकरांस 2:1

पूर्वी तुम्ही आपले अपराध आणि पातके यांमुळे आध्यात्मिक रीतीने मेला होता.

Interlinear

Choose Theme