Home Bibles गणना 27:5 · मराठी बायबल
गणना 27:5 · मराठी बायबल

तेव्हा मोशेने परमेश्वराला त्याने काय करायला हवे ते विचारले.

Cross references

निर्गम 18:15

मोशे आपल्या सासऱ्यास म्हणाला, “आपल्या अडचणी व आपले प्रश्न या संबंधी देवाचा काय निर्णय आहे ते विचारण्यासाठी लोक माझ्याकडे येतात.

निर्गम 25:22

मी जेव्हा तुला भेटेन तेव्हा कराराच्या कोशावर ठेवलेल्या देवदतांच्यामधुन मी तुझ्याशी बोलेन; आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.

लेवीय 24:12

त्याच्या संबंधी परमेश्वराची आज्ञा स्पष्टपणे कळावी म्हणून त्यांनी त्याला अटकेत ठेवले.

गणना 9:8

मोशे त्यांना म्हणाला, “ह्या संबंधी परमेश्वराचे काय म्हणणे आहे, हे मी त्याला विचारितो.”

गणना 15:34

त्यांनी त्या माणसाला तिथेच ठेवले कारण त्याला काय शिक्षा द्यायची ते त्यांना माहीत नव्हते.

ईयोब 23:4

मी देवाला माझी कथा सांगितली असती. माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता.

नीतिसूत्रे 3:5

परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.

Interlinear

Choose Theme