याचा अर्थ असा की आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही. आमच्या वडिलांचे नाव पुढे चालू राहणार नाही हे योग्य नाही. त्यांचे नाव संपून जाईन कारण त्यांना मुले नाहीत. म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो की आमच्या वडिलांच्या भावांना जी जमीन मिळेल त्यातली थोडी आम्हाला द्या.”
Cross references
परंतु काकुळतीने विनंती करुन मोशे आपला देव परमेश्वर ह्याला म्हणाला, “परमेश्वरा, तुझ्या रागाने तुझ्या लोकांचा नाश न होवो; तू तुझ्या महान शक्तीने व सामर्थ्याने त्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस
या मुली एलाजार हा याजक व नूनाचा पुत्र यहोशवा तसेच पंच यांच्याकडे येऊन त्यांना म्हणाल्या, “आम्हाला आमच्या पुरुष नातेवाइकांइतकाच वाटा द्यायला परमेश्वराने मोशेला सांगितले होते.” तेव्हा एलाजारने परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानून त्यांनाही जमिनीत हिस्सा दिला. त्यांच्या वडीलांच्या भावांना मिळाला असता तसाच हिस्सा या मुलींना मिळाला.
माझ्या शत्रूचा संपूर्ण नाश कर. पुढच्या पिढीला त्याचे नाव सर्व गोष्टीवरुन काढून टाकू दे.
चांगला माणूस हा दैदीप्यमान दिव्यासारखा असतो. पण दुष्ट माणूस चटकन् विझणाऱ्या दिव्यासारखा असतो.