Home Bibles गणना 1:22 · मराठी बायबल
गणना 1:22 · मराठी बायबल

शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक क्याचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;

Cross references

उत्पत्ति 29:33

लेआ पुन्हा गरोदर राहिली आणि तिला आणखी एक मुलगा झाला; ह्या मुलाचे नाव तिने शिमोन ठेवले, कारण ती म्हणाली, “माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम नाही हे परमेश्वराने ऐकले आहे म्हणून त्याने मला हा मुलगा दिला आहे.”

उत्पत्ति 34:25

तीन दिवसानंतर सुंता केलेले लोक जखमांच्या वेदनांनी बेजार झालेले असताना, याकोबाची दोन मुले शिमोन व लेवी यांना माहीत होते की ते लोक आता दुर्बल व कमकुवत असणार म्हणून मग ते नगरात गेले व त्यांनी तेथील सर्व पुरुषांना ठार मारले.

उत्पत्ति 42:24

म्हणून तो त्यांच्यापासून बाजूला जाऊन रडला थोडया वेळाने तो परत त्यांच्याकडे आला. आणि त्यांच्याशी बोलला इतर भाऊ पाहात असताना त्याने एका भावाला शिमोनला त्यांच्यातून काढून घेतले आणि बांधले.

उत्पत्ति 46:10

शिमोनाचे मुलगे; यमुवेल, यामीन, ओहाद, याकोन, सोहार आणि कनानी स्त्रीपासून झालेला मुलगा शौल.

उत्पत्ति 49:5

“हे भाऊ आहेत; या दोन भावांना तरवारींने लढण्याची आवड आहे.

गणना 2:12

“शिमोन वंशातल्या कुळांनी रऊबेन वंशाच्या छावणी शेजारी आपली छावणी उभारावी. सुरीशादैचा मुलगा शलूमीयेल हा शिमोन वंशाचा प्रमुख सरदार असावा.

गणना 26:12

शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेनमुवेलाचे नमुवेली कूळ. यामीनाचे यामीनी कूळ. याकीनाचे याकीनी कूळ.

प्रकटीकरण 7:7

शिमोन वंशातील 12,000 लोकांनालेवी वंशातील 12,000 लोकांनाइस्साखार वंशातील 12,000 लोकांना

Interlinear

Choose Theme