Home Bibles नहेम्या 3:15 · मराठी बायबल
नहेम्या 3:15 · मराठी बायबल

कोलहोजेचा मुलगा शल्लूम याने कारंज्याजी वेस दुरुस्त केली. शल्लूम मिस्पा जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने वेस बांधून तिला छप्पर केले. वेशीचे दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. मग दारांना कड्या व अडसर बसवले. शिवाय त्याने राजाच्या बागेलगतच्या सिल्लोम लळयाची भिंतही बांधली. दावीद नगरातून पायऱ्या उतरतात तिथपर्यंत त्याने डागडुजी केली.

Cross references

शास्ते 20:1

तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.

शास्ते 20:3

इस्राएल लोक मिस्पा येथे जमा झाल्याची बातमी बन्यामीन लोकांच्या कानावर आली. आता ही भयंकर घट्या घडली कशी याची इस्राएलांनी विचारणा सुरु केली.

2 शमुवेल 5:6

राजाने आपले लोक बरोबर घेऊन यरुशलेम येथे राहणाऱ्या यबूसी लोकांवर स्वारी केली तेव्हा ते यबूसी दावीदाला म्हणाले, “तू आमच्या नगरातप्रवेश करु शकणार नाहीस. आमच्या येथील आंधळे आणि पांगळे सुध्दा तुम्हाला थोपवतील.” (दावीदाला आपल्या नगरात प्रवेश करणे जमणार नाही असे त्यांना वाटले म्हणून ते असे म्हणाले.

2 शमुवेल 5:7

तरीपण दावीदाने सियोन किल्ला घेतला. दावीद नगर असे त्याचे नाव पडले.)

2 शमुवेल 5:9

दावीदाचा मुक्काम किल्यात होता व त्याचे नाव “दावीदनगर” असे दिले. मिल्लो नामक भाग त्याने उभारला. नगराच्या आत त्याने आणखी बऱ्याच इमारती उभारल्या.

2 राजे 25:4

नबुखद्नेस्सरच्या सैन्याने शेवटी तटाला खिंडार पाडले. त्या रात्री राजा सिद्कीया आणि त्याचे सैन्य यांनी पलायन केले. त्यांनी पळून जाण्यासाठी दुहेरी तटबंदीमधल्या गुप्त वाटेचा आश्रय घेतला. ही वाट राजाच्या बागेजवळ होती नगराभोवती शत्रूसैन्याचा वेढा होता पण सिद्कीया आणि त्याचे सैन्य वाळवंटाच्या दिशेने निसटले.

2 इतिहास 32:30

याच हिच्कीयाने गीहोनचा यरुशलेममधला वरचा प्रवाह अडवून त्याला दावीद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले.

नहेम्या 2:14

मग कारंजाचे प्रवेशद्वार आणि राजाचा तलाव यांच्याकडे गेलो.पण माझा घोडा पलीकडे जाऊ शकेल इतकीही जागा नसल्याचे जवळ गेल्यावर माझ्या लक्षात आले.

नहेम्या 3:7

गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी भिंतीच्या पुढील भागाचे काम केले. गिबोन मधला मलत्या आणि मेरोनोथ येथला यादोन आणि गिबोन आणि मिस्पा येथील लोकांनी हे काम केले. गिबोन आणि मिस्पा हा भाग फरात नदीच्या पश्चिमेडील भागाच्या राज्यपालांच्या सत्तेखाली होता.

नहेम्या 3:9

हूरचा मुलगा रफाया याने भिंतीचा पुढील भाग बांधून काढला. यरुशलेमच्या अर्ध्या भागाचा हा राज्यपाल होता.

नहेम्या 3:12

हल्लोहेशचा मुलगा शल्लूम याने त्यापुढचा भाग दुरुस्त केला. या कामात त्याच्या मुलींनी त्याला मदत केली. शल्लूम यरुशलेमच्या अर्ध्या भागाचा आधिकारी होता.

नहेम्या 3:14

रेखाबाचा मुलगा मल्कीया याने ही उकिरड्याची वेस बांधली. मल्कीया बेथ-हक्करेम या जिल्ह्याचा राज्यपाल होता. त्याने वेस दुरुस्त केली. दरवाजे बिजागऱ्यांसह लावले. या दरवाजांना कड्या, अडसर घातले.

नहेम्या 12:37

झऱ्याच्या वेशीपाशी ते पोहोंचले. पायऱ्या चढून ते दावीदनगरापर्यंत गेले. नगराच्या तटंबैदीच्या भिंतीवर ते होते. दावीदच्या घरावरुन चालत जाऊन ते पाण्याच्या वेशीकडे गेले.

यशया 8:6

माझा प्रभु, म्हणाला, “हे लोक संथ वाहणारे शिलोहाचे पाणी नाकारतात. ते रसीन व रमाल्याचा पुत्र (पेकह) यांच्या सहवासात आनंद मानतात.

यिर्मया 40:6

मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो गदल्याबरोबर यहूदात मागे राहिलेल्या लोकांमध्ये राहिला.

लूक 13:4

किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते?

योहान 9:7

मग येशूने त्या मनुष्याला सांगितले, “जाऊन शिलोह तळ्यात डोळे धू.” (शिलोह म्हणजे पाठविलेला) म्हणूने तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला. त्याने डोळे धुतले आणि तो परत आला, तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते.

Interlinear

Choose Theme