Home Bibles 2 इतिहास 32:30 · मराठी बायबल
2 इतिहास 32:30 · मराठी बायबल

याच हिच्कीयाने गीहोनचा यरुशलेममधला वरचा प्रवाह अडवून त्याला दावीद नगराच्या पश्चिमेकडून सरळ खाली आणले होते. हिज्कीयाला त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात यश मिळाले.

Cross references

यहोशवा 1:7

पण आणखी एका गोष्टीबद्दल तू खंबीर आणि समर्थ असले पाहिजेस. माझा सेवक मोशे याने तुला दिलेल्या आज्ञा कटाक्षाने पाळ. त्यांचे तंतोतंत पालन केलेस तर तू हाती घेतलेल्या सर्व कार्यात यशस्वी होशील.

1 राजे 1:33

राजा त्यांना म्हणाला, “माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून गीहोन झऱ्याकडे जा.

1 राजे 1:38

सादोक, नाथान, बनाया आणि राजाचे सेवक यांनी राजा दावीदाच्या सांगण्याप्रमाणे केले. दावीदाच्या खेचरावर शलमोनाला बसवून ते गीहोन येथे गेले.

1 राजे 1:45

मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहाने झऱ्याजवळ शलमोनाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण नगरात परतले. लोक त्यांच्या मागोमाग गेले. नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.

2 राजे 20:20

शहराला पाणीपुरवठा करणारी तळी आणि कालवे यांच्यासकट हिज्कीयाने जी कामगिरी बजावली तिची नोंद ‘यहूदाच्या राजांचा इतिहास’ या पुस्तकात आहे.

2 इतिहास 26:5

जखऱ्याच्या हयातीत त्याने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वराला मानणे त्याला जखऱ्याने शिकवले. तो असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने त्याचे कल्याण केले.

2 इतिहास 32:3

तेव्हा तो आपल्या सरदारांशी आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांशी बोलला. त्यांच्या साहाय्याने व त्यांच्याशी मसलत करुन राजाने नगराबाहेरच्या झऱ्यांचे पाणी अडवायचा एकमताने निर्णय घेतला. त्या सर्वांनी त्याला मदत केली.

2 इतिहास 32:4

झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर पाणी कुठले मिळायला?”

2 इतिहास 33:14

या घटनेनंतर मनश्शेने दावीद नगराभोवती आणखी एक कोट बांधला. हा कोट गीहोनच्या पश्चिमेकडील खोऱ्यात मासळी दरवाजाजवळ ओफेल टेकडी सभोवती असून खूप उंच होता. यहूदामधील सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये त्याने अधिकारी नेमले.

स्तोत्रसंहिता 1:1

1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्लामानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही आणि देवावरविश्वास न ठे वणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.

यशया 22:9

दावीदाच्या शहरांच्या भितींना भगदाडे पडायला सुरवात होईल. आणि तुम्हाला ती स्पष्टपणे दिसतील. मग तुम्ही घरांची मोजदाद कराल आणि तुम्ही घरांचे दगड तटाची भगदाडे बुजवायला वापराल. पाणी साठविण्यासाठी दोन भिंतीत जागा करून तुम्ही जुन्या झऱ्याचे पाणी सोडाल.तुमच्या बचावासाठी तुम्ही हे सर्व कराल पण ज्याने हे सर्व केले त्या देवावर तुम्ही श्रध्दा ठेवणार नाही. ज्याने फार पूर्वीच या गोष्टी करून ठेवल्या त्या देवाकडे तुमचे लक्षच जाणार नाही.

Interlinear

Choose Theme