यिर्मया 40:6 · मराठी बायबल
मग यिर्मया, मिस्पा येथे अहीकामचा मुलगा गदल्या ह्याच्याकडे गेला. तो गदल्याबरोबर यहूदात मागे राहिलेल्या लोकांमध्ये राहिला.
Cross references
यहोशवा 15:38
दिलान, मिस्पा, यकथेल,
यहोशवा 18:26
मिस्पा, कफीरा, मोजा
शास्ते 20:1
तेव्हा इस्राएलमधील लोक मिस्पा येथे परमेश्वरासमोर गोळा झाले. गिलादमधील लोकांसह झाडून सर्व लोक हजर होते.
शास्ते 21:1
आपल्यापैकी कोणीही बन्यामीनांना आपल्या मुली द्यायच्या नाहीत अशी इस्राएल लोकांनी मिस्पा येथे प्रतिज्ञा केली होती.
1 शमुवेल 7:5
शमुवेल त्यांना म्हणाला, “सर्व इस्राएली मिस्पा येथे एकत्र या. मी परमेश्वराकडे तुमच्या साठी प्रार्थना करीन.”
यिर्मया 39:14
मंदिराच्या चौकात, यहूदाच्या राजाच्या पाहऱ्यात असलेल्या यिर्मयाला त्या लोकांनी सोडविले आणि गदल्याकडे सोपविले. गदल्या अहिकामचा व अहिकाम शाफानचा मुलगा होता. यिर्मयाला घरी पाठवावे असा गदल्याला हूकूम होता. म्हणून यिर्मयाला घरी नेले गेले व तो त्याच्या आप्तांमध्ये राहू लागला.