Cross references
यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा मुलगा आणि मशुल्लाम बसोदयाचा मुलगा. त्यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले. नंतर कड्या व अडसर बसवले.
एज्रा एका उंच लाकडी मंचावर उभा होता. खास या प्रसंगाकरताच तो करवून घेतला होता. मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे एज्राच्या उजव्या बाजूला उभे होते तर पदाया, मीशाएल, मल्खीया, हाशूम हश्बद्दाना, जखऱ्या, आणि मशुल्लाम हे डावीकडे होते.
हिल्कीयाचा मुलगा सराया (हिल्कीया मशुल्लामचा मुलगा, मशुल्लाम सादोकचा, सादोक मरायोमचा, मरायोम अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधीक्षक होता.)
इद्दो, गिन्नथोई, अबीया,
एज्राच्या घराण्याचा प्रमुख मशुल्लाम. अमऱ्याच्या घराण्याचा प्रमुख यहोहानान.
अबीयाच्या घराण्याचा प्रमुख जिख्री. मिन्यामिन आणि मोवद्या यांच्या घराण्याचा प्रमुख पिल्तय.
दरवाजांच्या पलीकडच्या कोठारांवर पहारे करणाऱ्या द्वारपालांची नावे अशी: मत्तन्या, बकबुक्या, ओबद्या, मशुल्लाम, तल्मोन अक्कूब,
मग पुढील याजक आपापल्या जागी उभे राहिले: एल्याकीम, मासेया, मिन्यामीन, मीखाया, एल्योएनाई, जखऱ्या, हनन्या या याजकांजवळ त्यांचे रणशिंग होते.