Home Bibles मत्तय 12:2 · मराठी बायबल
मत्तय 12:2 · मराठी बायबल

जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, तेव्हा ते येशूला म्हणाले, “पाहा, तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे करू नये ते करीत आहेत.”

Cross references

निर्गम 20:9

आठवड्यातील सहा दिवस तू तुझे कामकाज करावेस;

निर्गम 23:12

“तुम्ही सहा दिवस काम करावे, व सातव्या दिवशी विसावा घ्यावा; त्यामुळे तुमच्या गुलामांना व इतर कामकऱ्यांनाही विसावा मिळेल व त्यांना मोकळे मोकळे वाटेल; तुमच्या बैलांना व गाढवानांही विसावा मिळेल.

निर्गम 31:15

काम करण्याकरता आठवड्याचे इतर सहा दिवस आहेत; परंतु सातवा दिवस विसावा घेण्यासाठी पवित्र दिवस आहे हा परमेश्वराला मान देण्याचा पवित्र दिवस आहे; जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे.

निर्गम 35:2

“कामकाजासाठी सहा दिवस आहेत परंतु सातवा दिवस विसाव्यासाठी पवित्र दिवस आहे, तो पाळून विसावा घेतल्यामुळे तुम्ही परमेश्वराचा सन्मान कराल. सातव्या दिवशी-शब्बाथ दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे.

गणना 15:32

या वेळी इस्राएल लोक अजून वाळवंटात रहात होते. एका माणसाला जळणासाठी लाकूड सापडले म्हणून तो ते गोळा करीत होता. परंतु तो शब्बाथचा दिवस होता. इतरांनी त्याला ते करताना पाहिले.

यशया 58:13

तुम्ही देवाच्या शब्बाथच्या नियमाविरूध्द वागून पाप करण्याचे थांबवाल आणि विशेष दिवशी स्वत:च्या खुषीकरिता काही करण्याचे टाळाल तेव्हा हे घडून येईल. तुम्ही शब्बाथला आनंदाचा दिवस मानावे. परमेश्वराच्या विशेष दिवसाचा तुम्ही मान राखावा. रोज तुम्ही जे करता आणि जे बोलता ते करण्याचे वा बोलण्याचे टाळून तुम्ही त्या दिवसाचा मान राखावा.

मत्तय 12:10

सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्याला विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?”

मार्क 3:2

येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.

लूक 6:6

असे झाले की दुसऱ्या एका शब्बाथाच्या दिवशी येशू सभास्थानात गेला, आणि शिकवू लागला. तेव्हा तेथे एक मनुष्य होता. त्याचा उजवा हात वाळलेला होता.

लूक 13:10

शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.

लूक 14:3

येशूने नियमशास्त्राच्या शिक्षकांना व परुश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की कसे?”

योहान 5:9

तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला, तो आपली खाट उचलून चालू लागला. हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता.

योहान 5:16

येशू शब्बाथ दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहूदी लोक यशूशी दुष्टपणे वागू लागले.

योहान 7:21

येशू त्यांना म्हणाला, “मी एक चमत्कार केला आणि तुम्ही सारे चकित झालात.

योहान 9:14

येशूने चिखल करुन त्या मनुष्याचे डोळे बरे केले होते. ज्या दिवशी येशूने हे केले तो शब्बाथ दिवस होता.

Interlinear

Choose Theme