Home Bibles मार्क 16:5 · मराठी बायबल
मार्क 16:5 · मराठी बायबल

त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या भयचकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरुष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.

Cross references

दानीएल 8:17

मग माणसाप्रमाणे दिसणारा गाब्रीएल देवदूत माझ्याजवळ आला. मी खूप घाबरलो. मी जमिनीवर पडलो. पण गाब्रीएल मला म्हणाला,” मुला हा दृष्टान्त क्रोधाच्या शेवटच्या वेळेसंबंधी आहे हे समजून घे.”

दानीएल 10:5

मी वर पाहिले, तर माझ्यासमोर एक माणूस उभा होता. त्याने तागाचे कपडे घातले होते उफाजमधील सोन्याचा कमरपट्टा त्याने बांधला होता.

दानीएल 10:12

मग दृष्टान्तातील माणस पुन्हा बोलू लागला तो म्हणाला, ‘दानीएला, घाबरू नकोस ज्या दिवसापासून तू ज्ञान मिळविण्याचे व देवापुढे नम्र होण्याचे ठरविलेस, त्या दिवसापासून तो तुझी प्रार्थना ऐकत आहे. तू प्रार्थना करीत असल्यामुळेच मी तुझ्याकडे आलो.

मत्तय 28:3

चमकणाऱ्या विजेसारखा तो देवदूत दिसत होता. त्याचे कपडे बफर्ासरखे शुभ्र होते.

मार्क 6:49

जेव्हा त्यांनी त्याला सरोवरावरून पाण्यावरून चालताना पाहिले तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले.

मार्क 9:15

सर्व लोक येशूला पाहताच आश्यर्यचकित झाले आणि ते त्याला वंदन करण्यासाठी धावले.

लूक 1:12

जेव्हा जखऱ्याने त्याला पाहिले तेव्हा तो अस्वस्थ झाला, आणि त्याला भीति वाटली.

लूक 1:29

परंतु या शब्दांनी ती अस्वस्थ झाली, आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करु लागली.

लूक 24:3

त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही.

योहान 20:8

शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्वा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला.

योहान 20:11

पण मरीया थडग्यासमोर रडत उभी राहिली, ती रडत असता आत डोकावण्यासाठी वाकली

Interlinear

Choose Theme