शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा मुलगा होता. अर्पक्षद शेमाचा मुलगा होता. शेम नोहाचा मुलगा होता. नोहा लामेखाचा मुलगा होता.
Cross references
लामेख एकशें ब्याऐंशी वर्षांचा झाल्यावर त्याला एक मुलगा झाला;
परंतु परमेश्वराला आनंद देणारा एक माणूस पृथ्वीवर होता तो म्हणजे नोहा.
देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केले.
अशा रीतीने देवाने पृथ्वीच्या पाठीवरील सर्वकाही म्हणजे मानव, पशू, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व जीवधारी प्राण्यांचा नाश केला; जे वाचले ते म्हणजे नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवात त्याच्या सोबत असलेले प्राणी, फक्त एवढेच.
पण देव नोहाला विसरला नाही; त्याने नोहाची व त्याच्या सोबत तारवात असलेल्या सर्व प्राण्यांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला. आणि पाणी दिसेनासे होऊ लागले.
देवाने नोहाला व त्याच्या मुलांना
नोहाबरोबर त्याचे मुलगे तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; (हाम हा कनानाचा बाप होता
नोहा आणखी म्हणाला, “शेमचा परमेश्वर देव धन्यवादित असो! कनान शेमचा गुलाम होवो.
शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो इब्री लोकांचा मुळ पुरुष होता.
शेमच्या कुळाची वंशावळ येणे प्रमाणे: जलप्रलयानंतर दोन वर्षांनी शेम शंभर वर्षांचा झाल्यावर त्याचा मुलगा अर्पक्षद जन्मला;
एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे.
नोहा, दानीएल व इयोब हे तिथले असले, आणि तरीसुध्दा मी त्या देशाला शिक्षा करीन. आपल्या चांगुलपणाने फारतर ते स्वत:चा जीव वाचवू शकत असले तरी त्या देशाला वाचवू शकत नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
नोहा तारवात जाईपर्यंत असे चालले होते. मग पूर आला. व त्या सर्वांचा नाश झाला.
ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, अशा गोष्टींच्या बाबतीत नोहाला सावधान करण्यात आले होते तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली. आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले, विश्वासामुळेच त्याने जगाचा धिक्कार केला आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारस बनला.
फार पूर्वी नोहाच्या काळात जेव्हा जहाज बांधले जात होते आणि देव धीराने वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी देवाची आज्ञा पाळली नाही, तेच हे आत्मे होत. फक्त थोडकेच म्हणजे आठ लोकच जहाजात गेले व त्यांचा पाण्यापासून बचाव झाला.
देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीनेराहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावरपाण्याचा महापूर आणाला.