Home Bibles लूक 3:23 · मराठी बायबल
लूक 3:23 · मराठी बायबल

जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे. योसेफ एलीचा मुलगा होता

Cross references

उत्पत्ति 41:46

योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली.

गणना 4:3

सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची दर्शनमंडपात सेवा करण्यासाठी गणती कर.

गणना 4:35

त्यांनी, सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या पुरुषांची गणती केली. दर्शनमंडपासाठी त्यांना खास काम दिले गेले होते.

गणना 4:39

म्हणजे सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली. त्यांना दर्शनमंडपासाठी करण्यासाठी विशेष काम दिले गेले होते.

गणना 4:43

म्हणजे सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षे वयाच्या सर्व पुरुषांची गणती करण्यात आली.

गणना 4:47

तीस ते पन्नास वर्षे वय असलेल्या व सैन्यात सेवा केलेल्या पुरुषांची गणती करण्यात आली; त्यांना दर्शनमंडपासाठी खास काम देण्यात आले. इस्राएल लोकांचे प्रवासात दर्शनमंडप वाहून नेण्याचे विशेष सेवेचे काम त्यांना देण्यात आले.

मत्तय 1:1

येशु ख्रिस्ताचा कुलवृत्तांत येणेप्रमाणे: तो दाविदाच्या कुळात जन्मला. दावीद अब्राहामाच्या कुळातील होता.

मत्तय 1:6

इशाय दावीद राजाचा पिता होता. दावीद शलमोनाचा पिता होता. (शलमोनाची आई पूर्वी उरीयाची पत्नी होती.)

मत्तय 1:16

याकोब योसेफाचा पिता होता. योसेफ मरीयेचा पती होता. मरीया येशूची आई होती. येशूला ‘ख्रिस्त’म्हटले आहे.

मत्तय 4:17

त्योवेळेपासून येशू उपदेश करू लागला व म्हणू लागला की, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”(मार्क 1:16-20; लूक 5:1-11)

मत्तय 13:55

हा त्या सुताराचा मुलगा ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? आणि याकोब व योसेफ आणि शिमोन व यहूदा याचे भाऊ आहेत ना?

मार्क 6:3

तो मरीयेचा मुलगाच ना? तो याकोब, योसे, यहूदा आणि शिमोनाचा भाऊ नव्हे काय? व या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय?” त्याच्या स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.

लूक 3:23

जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे. योसेफ एलीचा मुलगा होता

लूक 3:31

एल्याकीम मल्लयाचा मुलगा होता. मल्ल्या मिन्नाचा मुलगा होता. मिन्ना मत्ताथाचा मुलगा होता. मत्ताथ नाथानाचा मुलगा होता. नाथान दाविदाचा मुलगा होता.

लूक 4:22

तेव्हा प्रत्येकाने त्याच्याविषयी चांगले उद्गार काढले. आणि त्याच्या मुखातून येणाऱ्या कृपेच्या शब्दांबद्दल ते आश्चर्यचकित झाले. आणि ते म्हणाले, “हा योसेफाचाच मुलगा नव्हे काय?”

योहान 6:42

यहूदी लोक म्हणाला, “हा येशू आहे. आपण त्याच्या आईवडिलांना ओळखतो. येशू तर योसेफाचाच पुत्र आहे. ‘मी स्वर्गातून खाली आलो आहे’ असे तो कसे काय म्हणू शकतो?”

प्रेषितांचीं कृत्यें 1:1

प्रिय थियफिलस, येशूने जे सर्व काही केले आणि शिकविले त्याविषयी मी पहिले पुस्तक लिहिले.

Interlinear

Choose Theme