योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली.
Cross references
याकोबाच्या वंशाचा हा वृत्तान्त आहे.योसेफ सतरा वर्षांचा उमदा तरुण होता. शेळ्यामेढ्यांचा सांभाळ करणे हे त्याचे काम होते. आपल्या भावांबरोबर (म्हणजे आपल्या बापाच्या बायका बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर) तो हे काम करीत असे; त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले.
सैन्यात सेवा केलेल्या तीस ते पन्नास वर्षांच्या पुरुषांची दर्शनमंडपात सेवा करण्यासाठी गणती कर.
दावीद शौलकडे गेला आणि त्याच्या समोर उभा राहिला. शौलला तो फारच आवडला. दावीद त्याचा शस्त्रवाहक बनला.
दावीद राज्य करायला लागला तेव्हा तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
शलमोन ज्यांच्याशी सल्लामसलत करत असे अशी काही वृध्द मंडळी होती. त्यांनाच राजा रहबामने याबाबतीत सल्ला विचारला. तो म्हणाला, “या लोकांना मी काय सांगू?”
पण रहबामने हा सल्ला मानला नाही. आपल्या समवयस्क मित्रांना त्यांचे मत विचारले.
जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.
राजाला,सुदृढ, तरुण, ज्यांच्या अंगावर जखमेची खूण वा व्रण नाही, ज्यांच्या शरीरांत काहीही दोष नाही असे यहूदी तरुण हवे होते. ते देखणे व चाणाक्ष असावेत अशी राजाची अपेक्षा होती. त्यांनी सहजतेने पण लवकर सर्व गोष्टी शिकून राजाची सेवा करावी, अशी राजाची इच्छा होती. अश्पनजला, इस्राएलच्या त्या तरुणांना, खास्दी भाषा व लेखन शिकविण्यास सांगितले होते.
राजा त्यांच्याशी बोलल्यावर, त्याच्या लक्षात आले की दानीएल, हनन्या, मीशाएल व अजऱ्या ह्या चौघांएवढे कोणीही बुध्दिमान नाहीत. म्हणून ह्याच चौघांना राजाच्या पदरी ठेवले गेले.
जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोकांना असे वाटे की, येशू योसेफाचा मुलगा आहे. योसेफ एलीचा मुलगा होता
सर्व समची जागृत राहा. होणाऱ्या सर्व गोष्टींपासून जिवंत राहण्यासाठी आणि विश्वासाने मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहणे शक्य व्हावे यासाठी प्रार्थना करा.”
आता, तुम्ही पडू नये म्हणून तुम्हाला राखावयास जो समर्थ आहे आणि तुम्हाला आपल्या गौरवी समक्षतेत शुद्ध असेसादर करायला जो मोठ्या आनंदाने तयार आहे, त्याला आणि आपले तारण करणारा जो