थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका.
Cross references
आणि त्याच्या पुढे जेवण वाढले; परंतु अब्राहामाच्या सेवकाने जेवण घेण्याचे नाकारले; तो म्हणाला, “मी येथे येण्याचे कारण तुम्हाला सांगितल्याशिवाय जेवणार नाही.”तेव्हा लाबान म्हणाला, “ठीक आहे, तुम्ही येथे कशासाठी आला ते आम्हाला सांगा.”
परंतु तो सेवक त्यांना म्हणाला, “कृपा करुन मला थांबवून घेऊ नका; परमेश्वराने ही माझी फेरी सफळ केली आहे, तेव्हा आता मला धन्याकडे परत जाऊ द्या.”
दवेग नावाचा शौलचा एक अधिकारी त्या दिवशी तेथे होता. तो अदोमी असून शौलच्या मेंढपाळांचा प्रमुख होता. परमेश्वरासमोर त्याला थांबवून ठेवलेलेहोते.
मग गाढवावर खोगीर चढवून ती नोकराला म्हणाली, “आता चल आणि भरभर जाऊ मी सांगितल्या शिवाय वेग कमी करु नको!”
तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “चल, निघायची तयारी कर. माझी काठी बरोबर घे. कुणाशीही बोलत थांबू नको. कोणी तुला भेटले तर नमस्कार करण्यापुरताही थांबू नको. कोणाच्या अभिवादनाला उत्तर देऊ नको. माझ्या काठीने त्या मुलाच्या चेहऱ्याला स्पर्श कर.”
तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस.
तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका.
त्याने त्यांना आज्ञा दिल्या की, “काठीशिवाय प्रवासासाठी त्यांनी काही घेऊ नये. भाकर पिशवी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका.
तो त्यांना म्हणाल, “तुमच्या प्रवासासाठी बरोबर काठी, पिशवी, भाकरी, चांदीची नाणी, दोन-दोन अंगरखे असे काहीही घेऊ नका.
तो दुसऱ्या एकाला म्हणाला, “माझ्यामागे ये.” पण तो मनुष्य म्हणाला, “पहिल्यांदा मला जाऊ दे आणि माझ्या वडिलांना पुरु दे.”
थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका.
येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हांला थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांस काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.”