तो त्यांना म्हणाल, “तुमच्या प्रवासासाठी बरोबर काठी, पिशवी, भाकरी, चांदीची नाणी, दोन-दोन अंगरखे असे काहीही घेऊ नका.
Cross references
तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.
तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका.
त्याने त्यांना आज्ञा दिल्या की, “काठीशिवाय प्रवासासाठी त्यांनी काही घेऊ नये. भाकर पिशवी किंवा कमरकशात पैसे काही घेऊ नका.
त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन सदरे असतील त्याने ज्याच्याकडे काहीच नाही त्याला ते वाटून द्यावे. ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
नंतर लेवीने त्याच्या घरी येशूसाठी मोठी मेजवानी दिली. जकातदारांचा आणि इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्याबरोबर जेवत होता.
थैली, पिशवी किंवा वहाणा बरोबर घेऊ नका, व रस्त्याने जाताना कोणाला सलाम करु नका.
मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हांस सांगतो, स्वत:च्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करु नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करु नका.
जर देवाने जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हांला तो कितीतरी अधिक (चांगला) पोशाख घालणार नाही काय!
येशू शिष्यांना म्हणाला, “जेव्हा मी तुम्हांला थैली, पिशवी व वहाणांशिवाय पाठविले, तेव्हा तुम्हांस काही कमी पडले का?” ते म्हणाले, “काहीही नाही.”
सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.