सियोनेची वडिल धारी मंडळी अगदी मूकपणे धुळीत बसते. ते डोक्यात माती भरून घेतात. ते गोणपाटाचे कपडे घालतात. यरुशलेमच्या तरुणी दु:खाने मान खाली घालून बसतात.
Cross references
यहोशवाने हे ऐकले तेव्हा दु:खाने त्याने आपली वस्त्रे फाडली. पवित्र करार कोशापुढे त्याने लोटांगण घातले. संध्याकाळपर्यंत तो तसाच पडून राहिला. इस्राएलच्या प्रमुखांनीही तसेच केले. दु:खाने, त्यांनीही आपल्या डोक्यात माती घालून घेतली.
तामारने उद्विग्न मन:स्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करु लागली.
परंतु बऱ्याच अंतरावरुन जेव्हा त्यांनी ईयोबला पाहिले तेव्हा तो ईयोबच आहे याची त्यांना खात्री वाटेना. तो खूप वेगळा दिसत होता. त्यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले आणि धूळ आपल्या डोक्यावर उडवून घेतली.
नंतर तिन्ही मित्र सात दिवस व सात रात्री ईयोब बरोबर बसून राहिले. ईयोबशी कुणी एक शब्दही बोलले नाही कारण ईयोब किती सहन करत आहे ते त्यांना दिसत होते.
वेशीजवळ असलेल्या सभा-संमेलनाच्या जागी शोककळा पसरेल. चोर व लुटारूंनी सर्वस्व लुटलेल्या स्त्रीप्रमाणे यरूशलेम नगरी एकटीच बसून शोक करेल.
मवाबमधील सर्वांनी घरादारातील सर्वांनी काळे कपडे घातले आहेत व ते रडत आहेत.
नंतर राजाचा कारभारी (हिज्कीयाचा मुलगा एल्याकीम) राजाचा चिटणीस (शेबना) व राजाच्या कारकिर्दीची नोंद ठेवणारा (आसाफचा मुलगा यवाह) ह्यांनी आपले कपडे फाडले, (ह्याचा अर्थ त्यांना फार दु:ख झाले होते.) ते तिघे हिज्कीयाकडे गेले व त्यांनी सेनापतीचे सर्व म्हणणे त्याला सांगितले.
“धुळीत पड आणि तेथेच बस! खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कुमारिके, जमिनीवर बस. तू आता सत्तेवर नाहीस. लोक तुला नाजूक, कुमारी समजणार नाहीत.
“बाबेल, तेथेच शांत बसून राहा. खास्दयांच्या (खाल्डियनांच्या) कन्ये, अंधारात जा, का? कारण तू यापुढे ‘राज्याची राणी’ राहणार नाहीस.
“आपण येथे नुसतेच का बसलो आहोत? या भक्कम शहराकडे पळून जाऊ या, जर परमेश्वर आपला देव, आपल्याला मारणारच असेल तर आपण तेथेच मरु या. आपण परमेश्वराविरुद्ध वागून पाप केले. म्हणून देवाने आपल्याला विषारी पाणी प्यायला दिले.
एके काळी काळी यरुशलेम लोकांनी गजबजलेली नगरी होती. पण आता ती अगदी ओसाड झाली आहे. यरुशलेम जगातील मोठ्या नगरांमधील एक होती. पण आता ती वधवेप्रमाणे झाली आहे. एके काळी ती नगरांमधील राजकुमारी होती. पण आता तिला दासी केले गेले आहे.
सियोनचे रस्ते दु:खी आहेतकारण आता पूर्वकाळासाठी कोणीही कधीही सियोनकडे येत नाही. सियोनची सर्व दारे नष्ट केली गेली. तिचे याजक उसासे टाकतात. तिच्या तरुणींना पकडून नेले आहे ह्य सर्वामुळे ती दु:खी कष्टी झाली आहे.
परमेश्वर त्याचे जोखड मानेवर ठेवत असताना माणसाने मुकाट्याने एकटे बसावे.
एकेकाळी ज्यांनी पौष्टिक अन्न खाल्ले, तेच आता रस्त्यावर मरत आहेत. जे चांगल्या, लाल कपड्यात वाढले, ते आता कचऱ्याच्या ढिगांतून मिळेल ते उचलतात.
परमेश्वराने स्वत: त्या लोकांचा नाश केला. त्याने त्यांची अजिबात काळजी घेतली नाही. त्यांने याजकांना मानले नाही त्यांने यहुदातील वृध्दांना दया दाखवली नाही.
शत्रूंने आमच्या राजपुत्रांना फाशी दिली. त्याने आमच्यातील वृध्दांचा मान ठेवला नाही.
वृध्द आता नगरीच्या द्वारांत बसत नाहीत. तरुण गायनवादन करीत नाहीत.
ते शोकप्रदर्शक कपडे घालतील आणि अतिशय भयभीत होतील. प्रत्येक चेहरा लज्जित झालेला तुम्हाला दिसेल. दु:ख प्रकट करण्यासाठी ते आपली डोकी भादरतील.
ते तुझ्यासाठी डोक्यावरचे सर्व केस कापतील. शोकप्रदर्शक कपडे घालतील. मृतासाठी करतात तसे ते तुझ्यासाठी शोक करतील.
एखाद्या तरुण वाग्दत्त वधूचा भावी पती मारला गेल्यावर ती जशी रडते, तसे रडा!
त्या वेळी, सुज्ञ शिक्षक गप्प बसतील. का? कारण ती वाईट वेळ आहे.
मंदिरातील गाण्याचे रूपांतर विलापिकेत होईल. परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला. सगळीकडे प्रेतेच प्रेते असतील. लोक गुपचूप, प्रेते उचलतील आणि ढिगावर फेकतील.”
त्या वेळी, सुंदर तरुण-तरुणी तहानेने दुर्बल होतील. शोमरोनच्या पापाच्याजोरावर त्यांनी वचने दिली. ते म्हणाले, ‘दान, तुझा परमेश्वर जिवंत आहे, तितक्याच खात्रीपूर्वकआम्ही वचन देतो....’ आणि ते म्हणाले, ‘जितका बैर-शेबा परमेश्वर जिवंत आहे, तितक्याच खात्रीपूर्वक आम्ही वचन देतो....’ हे लोक पडतील, आणि ते परत कधीही उठणार नहीत.”
मग ते आपल्या डोक्यात धूळ घालतील आणि शोक करतील.“भयंकर! भयंकर! हे महान नगरी, ज्या सर्वांकडे समुद्रात जहाजे आहेत ते तिच्या संपत्तीमुळे श्रीमंत झाले एका तासात तिचासर्वनाश झाला.