Home Bibles 2 शमुवेल 13:19 · मराठी बायबल
2 शमुवेल 13:19 · मराठी बायबल

तामारने उद्विग्न मन:स्थितीत आपले कपडे फाडले आणि डोक्यात राख घालून घेतली. डोक्यावर हात आपटून ती शोक करु लागली.

Cross references

यहोशवा 7:6

यहोशवाने हे ऐकले तेव्हा दु:खाने त्याने आपली वस्त्रे फाडली. पवित्र करार कोशापुढे त्याने लोटांगण घातले. संध्याकाळपर्यंत तो तसाच पडून राहिला. इस्राएलच्या प्रमुखांनीही तसेच केले. दु:खाने, त्यांनीही आपल्या डोक्यात माती घालून घेतली.

1 शमुवेल 4:12

त्या दिवशी एक बन्यामीन माणूस युद्धातून धावत निघाला. दु:खाने तो कपडे फाडत होता. डोक्यात धूळ घालून घेत होता.

2 शमुवेल 1:2

तिसऱ्या दिवशी तिथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छापणीतला होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. सरळ दावीदापाशी येऊन त्याने लोटांगण घातले.

2 शमुवेल 1:11

हे ऐकून दावीदाला इतके दु:ख झाले की त्या भरात त्याने आपले कपडे फाडले. त्याच्या सोबतच्या लोकांनीही त्याचे अनुसरण केले.

एस्तेर 4:1

जे काही झाले ते मर्दखयच्या कानावर आले. यहुद्यांविरुध्द राजाने काढलेला हुकूम त्याला समजला तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली. शोकाची वस्त्रे परिधान करून डोक्याला राख फासून तो नगरातून मोठयाने आक्रोश करत आणि रडत निघाला.

ईयोब 2:12

परंतु बऱ्याच अंतरावरुन जेव्हा त्यांनी ईयोबला पाहिले तेव्हा तो ईयोबच आहे याची त्यांना खात्री वाटेना. तो खूप वेगळा दिसत होता. त्यांनी मोठ्याने रडायला सुरुवात केली. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी त्यांनी आपले कपडे फाडले आणि धूळ आपल्या डोक्यावर उडवून घेतली.

ईयोब 42:6

आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चात्ताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून माझे मन आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”

यिर्मया 2:37

मग अखेरीला तुला मिसरलाही सोडावे लागेल आणि लाजेने तोंड लपवावे लागेल. तू त्या देशांवर विश्वास ठेवलास. पण परमेश्वराने त्या देशांना नाकारले. म्हणून जिंकण्यासाठी ते तुला मदत करु शकत नाहीत.

Interlinear

Choose Theme