Home Bibles यहोशवा 8:2 · मराठी बायबल
यहोशवा 8:2 · मराठी बायबल

यरीहो नगर आणि त्यांचा राजा यांचा तुम्ही पाडाव केलात तसाच आय नगराचा आणि राजाचाही कराल. फक्त यावेळी सर्व संपत्तीची लूट तुम्ही स्वत:साठी ठेवू शकता. येथील गुरेढोरे व संपत्ती तुम्ही आपापसात वाटून घ्या. आता आपल्या सैन्याला नगराच्या पिछाडीला दबा धरून बसण्यास सांग.”

Cross references

अनुवाद 2:35

तेथील पशुधन आणि मौल्यवान चिजा मात्र आम्ही आमच्यासाठी घेतल्या.

अनुवाद 3:2

परमेश्वर मला म्हणाला, ‘ओगला भिऊ नका. तो, त्याची प्रजा आणि त्याची भूमी मी तुमच्याच हाती सोपवणार आहे. हेशबोनवर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सीहोन याचा पराजय केलात तसाच याचाही कराल.’

अनुवाद 20:14

पण तेथील बायका, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.

यहोशवा 6:21

लोकांनी शहरातील सर्व गोष्टींचा नाश केला. तरूण आणि वृध्द पुरूष, तरूण आणि वृध्द स्त्रिया, जनावरे, शेळ्या मेंढ्या, गाढवे अशा सर्व सजीवांची त्यांनी हत्या केली.”

यहोशवा 8:7

तेव्हा आपल्या लपण्याच्या जागा सोडून बाहेर या आणि नगराचा ताबा घ्या. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जिंकण्याचे सामर्थ्य देईल.

यहोशवा 8:9

मग यहोशवाने त्यांना रवाना केले. ते आयच्या पश्िचमेस बेथेल व आय यांच्या दरम्यान एका जागी दबा धरून बसले. आणि यहोशवा आपल्या इतर माणसांबरोबर त्या रात्री राहिला.

यहोशवा 8:12

यहोशवाने मग जवळजवक पाच हजार माणसांना आयच्या पश्चिमेस बेथेल व आय यांच्या मध्ये दबा धरून बसण्यास पाठवले.

यहोशवा 8:14

आयच्या राजाने इस्राएलाचे सैन्य पाहिले तेव्हा तो व नगरातील माणसे इस्राएलांशी युध्द करण्यास लगबगीने निघाली. राजा नगराच्या पूर्वेला गेला. त्यामुळे नगराच्या पिछाडीला लपलेले सैन्य त्याला दिसले नाही.

यहोशवा 8:19

दबा धरून बसलेल्या इस्राएलांनी हे पाहताच आपल्या जागा सोडल्या आणि ते तात्काळ नगरावर चालून गेले. नगरात शिरून त्यांनी त्याचा ताबा घेतला. लगेचच त्यांनी नगरात जाळपोळ सुरू केली.

यहोशवा 8:24

या लढाईत इस्राएलाच्या सैन्याने आयच्या लोकांचा मोकळ्या मैदानात तसेच वाळवंटात पाठलाग करत त्या साऱ्यांची कत्तल केली. नंतर ते नगरात परतले व तेथे उरलेल्या सर्वांची हत्या केली.

यहोशवा 8:27

शहरातील गुरेढोरे आणि इतर मालमता इस्राएल लोकांनी स्वत:साठी ठेवली. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिल्या तेव्हा यासाठी अनुमती दिलेलीच होती.

यहोशवा 9:3

यरीहो आणि आय या नगरांचा पाडाव यहोशवाने कसा केला हे गिबोनाच्या लोकांनी ऐकले.

यहोशवा 10:1

त्यावेळी यरूशलेमचा राजा अदोनीसदेक हा होता. यहोशवाने आय चा पाडाव ते पूर्ण उध्वस्त केल्याचे त्याने ऐकले. यरीहो आणि त्याच्या राजाचेही असेच झाल्याचे त्याला समजले. गिबोनच्या रहिवाश्यांनी इस्राएलांशी शांतीचा करार केल्याचे ही त्याच्या कानावर आले. आणि ते तर यरूशलेमच्या जवळच होते.

यहोशवा 10:28

त्या दिवशी यहोशवाने मक्केदाचा पराभव केला. तेथील राजा आणि नगरातील लोक यांना यहोशवाने ठार केले. कोणीही वाचला नाही. यरीहोच्या राजाची केली तीच गत यहोशवाने मक्के दाच्या राजाचीही केली.

यहोशवा 11:14

या नगरांमध्थे मिळालेली लूट इस्राएल लोकांनी स्वत:करता ठेवली. तसेच तेथील जनावरेही घेतली. पण तेथील लोकांना मारले कोणालाही जिवंत ठेवले नाही.

शास्ते 20:29

अहरोन पुत्र एलाजार याचा मुलगा फिनहास हा तेव्हा याजक होता. इस्राएलांनी विचारले. “बन्यामीन आमचे बांधवच आहेत. पुन्हा आम्ही त्यांच्यावर चाल करुन जावे की ही लढाई संपुष्टात आणावी?” परमेश्वराने सांगितले, “चाल करुन जा. उद्या मी तुमच्या हातून त्यांचा पराभव करवतो.”

2 इतिहास 13:13

पण यराबामने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला.

2 इतिहास 20:22

लोकांनी देवाची स्तुतिगीते म्हणण्यास सुरुवात केल्याबरोबर परमेश्वराने चाल करुन आलेल्या अम्मोनी, मवाबी आणि सेइर पर्वतांतील लोकांशी गनिमी काव्याने लढणारी फौज मोक्याच्या जागी बसवली.

ईयोब 27:16

दुष्ट माणसाला इतकी चांदी मिळेल की ती त्याला मातीमोल वाटेल, त्याला इतके कपडे मिळतील की ते त्याला मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.

स्तोत्रसंहिता 39:6

आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते. आपली सगळी संकटे निष्कारणच असतात. आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्यालामाहीत नसते.

नीतिसूत्रे 13:22

चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल.

नीतिसूत्रे 28:20

जो देवाची भक्ती करतो त्याला देव आशीर्वाद देईल. पण जो माणूस फक्त श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो त्याला शिक्षा होईल.

यिर्मया 17:11

काही वेळा, एकादी पक्षीण स्वत: न घातलेले अंडे उबविते. धनासाठी जो माणूस फसवणूक करतो, तो ह्या पक्षिणी सारखाच असतो. अर्ध्या आयुष्यातच हा माणूस धन गमावेल. त्याच्या आयुष्याच्या सरत्या काळात तो दुष्ट म्हणून ओळखला जाईल.”

यिर्मया 51:12

बाबेलच्या तटासमोर झेंडा उभारा. जास्ती रक्षक आणा. पहारेकऱ्यांना त्यांच्या जागी उभे करा. छुपा हल्ला करण्याची तयारी करा. परमेश्वर, त्याने ठरविल्याप्रमाणे करील. बाबेलच्या लोकांविरुद्ध, त्याने सांगितल्याप्रमाणे, तो कारवाई करील.

लूक 12:20

पण देव त्याला म्हणतो, “मूर्खा, जर आजा तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’

Interlinear

Choose Theme