Home Bibles नीतिसूत्रे 13:22 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 13:22 · मराठी बायबल

चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल.

Cross references

उत्पत्ति 17:7

आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन.

एज्रा 9:12

तेव्हा इस्राएल लोकांनो, तुमच्या मुलांशी त्यांच्या ऐश्वर्याची इच्छा करु नका. माझ्या आदेशांचे पालन करा म्हणजे तुम्ही बलशाली व्हाल आणि या भूमीवर चांगल्या गोष्टी भोगाल. हा प्रदेश आपल्या मुलाबाळांना सुपूर्द कराल.”

ईयोब 27:16

दुष्ट माणसाला इतकी चांदी मिळेल की ती त्याला मातीमोल वाटेल, त्याला इतके कपडे मिळतील की ते त्याला मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.

ईयोब 27:17

परंतु चागंल्या माणसाला त्याचे कपडे मिळतील आणि निरपराध्याला त्याची चांदी मिळेल.

स्तोत्रसंहिता 25:12

जर एखाद्याने परमेश्वराच्या मार्गाने जायचे ठरवले तर देव त्याला उत्तम रीतीने कसे जगायचे ते दाखवील.

स्तोत्रसंहिता 37:25

मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत.

स्तोत्रसंहिता 102:28

आज आम्ही तुझे सेवक आहोत. आमची मुले इथे राहातील आणि त्यांचे वंशजसुध्दा तुझी उपासना करायला इथे असतील.”

स्तोत्रसंहिता 112:2

त्याचे वंशज पृथ्वीवर महान होतील. चांगल्या लोकाच्या वंशजांना खरोखरच आशीर्वाद लाभतील.

स्तोत्रसंहिता 128:6

आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.

नीतिसूत्रे 28:8

जर तुम्ही गरीबांना फसवून श्रीमंत झालात तर तुम्ही लवकरच संपत्ती गमवाल. जो माणूस त्यांच्याशी दयाळू असतो त्याच्याकडे ती जाईल.

उपदेशक 2:26

जर माणसाने चांगले कृत्य केले आणि देवाला प्रसन्न केले तर देव त्याला शहाणपण,ज्ञान आणि आनंद देईल. पण जो माणूस पाप करतो त्याला वस्तू गोळा करायचे आणि त्यांचे ओझे वहायचे काम मिळेल. देव वाईट माणसाकडून घेतो आणि चांगल्या माणसाला देतो. पण त्याचे सर्व काम निरुपयोगी आहे. हे वारा पकडण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे.

Interlinear

Choose Theme