Home Bibles यहोशवा 8:27 · मराठी बायबल
यहोशवा 8:27 · मराठी बायबल

शहरातील गुरेढोरे आणि इतर मालमता इस्राएल लोकांनी स्वत:साठी ठेवली. परमेश्वराने यहोशवाला आज्ञा दिल्या तेव्हा यासाठी अनुमती दिलेलीच होती.

Cross references

गणना 31:22

लोखंड, पत्रा किंवा शिसे अग्नीत टाकले पाहिजे. नंतर त्या वस्तू खास पाण्याने धुवाव्यात म्हणजे त्या शुद्ध होतील. जर काही वस्तू अग्नीत टाकता येत नसतील तर त्या तुम्ही विशिष्ट पाण्याने धुवाव्यात.

गणना 31:26

“सैनिकांनी जे कैदी, प्राणी आणि इतर गोष्टी युद्धावरुन आणल्या आहेत त्यांची मोजदाद एलाजार याजक, तू आणि नेत्यांनी करावी.

अनुवाद 3:7

गुरंढोर आणि किंमती लूट मात्र घेतली.

यहोशवा 8:2

यरीहो नगर आणि त्यांचा राजा यांचा तुम्ही पाडाव केलात तसाच आय नगराचा आणि राजाचाही कराल. फक्त यावेळी सर्व संपत्तीची लूट तुम्ही स्वत:साठी ठेवू शकता. येथील गुरेढोरे व संपत्ती तुम्ही आपापसात वाटून घ्या. आता आपल्या सैन्याला नगराच्या पिछाडीला दबा धरून बसण्यास सांग.”

यहोशवा 11:4

तेव्हा या सर्व राजांच्या फौजा एकत्र आल्या. अगणित योध्दे जमा झाले. घोडे, रथ बहुसंख्य होते. ती एक अतिविशल सेना होती असंख्य माणसांचा समुदाय समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या कणांसारखा पसरला होता.

स्तोत्रसंहिता 50:10

मला त्या प्राण्यांची गरज नाही. जंगलातले सगळे प्राणी आधीच माझ्या मालकीचे आहेत हजारो पर्वातावरील सगळे प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.

मत्तय 20:15

मी माझ्या पैशाचा वापर मला पाहिजे तसा करू शकत नाही का? मी लोकांशी चांगला आहे म्हणून, तुला हेवा वाटतो का?’

Interlinear

Choose Theme