मग ती बेथेल (लूज) पासून अकर्लोकांची सीमा अटारोथ येथपर्यंत जाते.
Cross references
त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले.
तेथून ती दक्षिणेला लूज (म्हणजेच बेथेल) कडे वळते व खाली अटारोथ अद्दार येथवर जाते. अटारोथ-अद्दार हे बेथ- होरोनच्या दक्षिणेकडील टेकडीवर आहे.
योसेफच्या वंशातील लोक बेथेल नगरावर हल्ला करायला चाल करुन गेले. (बेथेलचे नांव पूर्वी लूज असे होते.) योसेफच्या लोकांना परमेश्वराची साथ होती. योसेफच्या लोकांनी आधी काही हेर बेथेलला पाठवले. बेथेलचा पाडाव करण्याच्या दृष्टीने त्यांनी टेहेळणी केली.
दावीद डोंगरमाथ्यावर पोहोंचला. येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे त्या वेळी हूशय अकर् त्याला भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता, त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.
तेव्हा दावीदाचा मित्र हुशय नगरात परतला. अबशालोम ही यरुशलेममध्ये आला.
दावीदाचा मित्र अकर् हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, “राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो”
अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता.