Home Bibles 1 इतिहास 27:33 · मराठी बायबल
1 इतिहास 27:33 · मराठी बायबल

अहीथोफेल राजाचा मंत्री आणि हूशय राजाचा मित्र होता. हा अकर लोकांपैकी होता.

Cross references

2 शमुवेल 15:12

अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्याला अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.

2 शमुवेल 15:32

दावीद डोंगरमाथ्यावर पोहोंचला. येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे त्या वेळी हूशय अकर् त्याला भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता, त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.

2 शमुवेल 15:37

तेव्हा दावीदाचा मित्र हुशय नगरात परतला. अबशालोम ही यरुशलेममध्ये आला.

2 शमुवेल 16:16

दावीदाचा मित्र अकर् हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, “राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो”

2 शमुवेल 16:23

अहिथोफेलचा सल्ला दावीद आणि अबशालोम या दोघांनाही उपयोगी पडला. लोकांना त्याचे म्हणणे देवाच्या शब्दा इतके महत्वाचे वाटले.

2 शमुवेल 17:23

इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरीतच दफन केले.

1 राजे 4:5

नाथानचा मुलगा अजऱ्या हा जिल्हाधिकाऱ्यांचा प्रमुख होता.नाथानचा मुलगा जाबूद याजक असून राजाचा सल्लागार होता.

स्तोत्रसंहिता 55:13

परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस माझा मित्र, माझा साथी, माझा दोस्त.

जखऱ्या 13:7

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “हे तलवारी, मेंढपाळांवर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर प्रहार कर. माझ्या मित्रावर वार कर. मेंढपाळावर वार कर म्हणजे मेंढ्या पळून जातील आणि मी त्या लहान जीवांना शिक्षा करीन.

Interlinear

Choose Theme