तेव्हा परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याला घाबरू नको. मी तुमच्याहातून त्यांचा पराभव करवीन. उद्या या वेळेपर्यंत तुम्ही त्या सर्वांचा संहार केलेला असेल. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडा व रथांना आगी लावा.”
Cross references
तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करुन विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची पूजा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हाला अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.
मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुचिर्भूत आणि पवित्र व्हा कारण उद्या परमेश्वर तुमच्यामार्फत अद्भुत गोष्टी करणार आहे.”
परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याची भीती बाळगू नका. त्याचां पराभव करण्याची मी तुम्हाला आनुज्ञा देत आहे. यांच्यापैकी कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही.”
परमेश्वराने सांगितले होते तसेच यहोशवाने केले. त्यांच्या घोड्यांचे पाय तोडले व रथ अगीच्या भक्ष्यस्थानी टाकले.
इस्राएल लोकांनी परमेश्वराला प्रश्न विचारला (त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश बेथेल येथे होता)
या सर्वांनी शौलच्या सुरात सूर मिसळून याबेशच्या दूतांना सांगितले, “उद्या दुपारपर्यंत तुमच्या बचावासाठी आम्ही येत आहोत असे याबेश गिलाद मधील लोकांना सांगा.”शौलचा हा निरोप दूतांनी पोचवल्यावर याबेशच्या लोकांमध्ये आनंदी आनंद झाला.
सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने हददेजर कडून बळकावले. रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करुन टाकले.
अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!”
उद्या त्यांचा सामना करायला जा आणि लढा. ते सीसच्या खिंडीतून वर येत आहेत. दरीच्या टोकाला यरुएल वाळवंटाच्या दुसऱ्या बाजूला तुमची त्यांच्याशी गाठ पडेल.
काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यावर विश्वास ठेवतात परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही.
परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युध्दे थांबवू शकतो तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो.
देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”
तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.
युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक त्याला आनंद देत नाहीत.
चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.
तुम्ही म्हणता, “नाही! आम्हाला पळून जायला घोडे हवेत.” ते खरेच आहे. तुम्हाला घोड्यांवरून पळून जावे लागेल. पण शत्रू तुमचा पाठलाग करील. शत्रूचा वेग तुमच्यापेक्षा जास्त असेल.
मदत मागण्यासाठी मिसरमध्ये जाणारे ते लोक पाहा ते घोडे मागतात. घोडे आपला बचाव करतील असे त्यांना वाटते. मिसरमधील रथ आणि घोडेस्वार आपल्याला वाचवतील असा या लोकांचा समज आहे. मिसरचे सैन्य मोठे असल्याने आपण सुरक्षित आहोत असेच त्यांना वाटते. हे लोक इस्राएलच्या पवित्र देवावर विश्वास ठेवत नाही. ते परमेश्वराची मदत मागत नाहीत.
“अश्शूर आम्हाला वाचविणार नाही. आम्ही घोड्यांवर स्वार होणार नाही. आम्ही हातांनी बनविलेल्या गोष्टींना ‘आमचा देव’ असे पुन्हा म्हणणार नाही का? कारण अनाथांवर करुणा करणारा तूच एकमेव आहेस.