Home Bibles यहोशवा 11:5 · मराठी बायबल
यहोशवा 11:5 · मराठी बायबल

हे सर्व राजे मेरोम या लहानशा नदीजवळ भेटले. त्या सर्वांनी तेथेच तळ ठोकला आणि ते इस्राएलविरुध्द लढाईची आखणी करू लागले.

Cross references

यहोशवा 9:2

हे सर्व राजे एक झाले आणि त्यांनी यहोशवा व इस्राएल लोक यांच्यावर चढाई करण्याचा बेत केला.

2 शमुवेल 10:15

इस्राएलानी आपला पराभव केला हे अराम्यांनी पाहिले. तेव्हा ते सर्व एकत्र आले आणि त्यांनी (मोठे सैन्य उभारले)

स्तोत्रसंहिता 3:1

परमेश्वरा मला खूप शत्रू आहेत. खूप लोक माझ्या विरुद्ध गेले आहेत.

स्तोत्रसंहिता 48:5

त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. ते घाबरले आणि पळत सुटले.

स्तोत्रसंहिता 118:10

बऱ्याच शत्रूंनी मला घेरले होते. परंतु परमेश्वराच्या शक्तीमुळे मी माझ्या शत्रूंचा पराभव केला.

यशया 8:9

सर्व राष्ट्रांनो, युध्दाची तयारी करा, तुम्ही पराभूत व्हाल, दुरवरच्या सर्व देशांनो, ऐका! लढाईची तयारी करा, तुमचा पराभव होईल.

प्रकटीकरण 16:14

हे सर्व दुष्ट आत्मे सैतानाचे आत्मेआहेत. ते चमत्कार करातात, हे आत्मे सगळ्या जगातील राजांकडे जातात व त्यांना सर्वसमर्थ देवाच्या महान दिवशीलढाईसाठी एकत्र जमवतात.

Interlinear

Choose Theme