Home Bibles अनुवाद 7:16 · मराठी बायबल
अनुवाद 7:16 · मराठी बायबल

तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या हाती सोपवलेल्या सर्वांचा तुम्ही पराभव करुन विध्वंस करा. त्यांच्याबाबतीत वाईट वाटून घेऊ नका. त्यांच्या दैवतांची पूजा करु नका. कारण ती दैवते म्हणजे तुम्हाला अडकवणारा सापळा आहे. त्याने तुमच्या आयुष्याचा नाश होईल.

Cross references

निर्गम 23:33

तुम्ही त्यांना तुमच्या देशात राहू देऊ नका; तुम्ही जर त्यांना तुमच्यात राहू द्याल तर ते पुढे तुम्हाला सापव्व्यासारखे अडकाविणारे होतील ते तुम्हाला माझ्याविरुद्ध पाप करावयास लावतील व तुम्ही त्यांच्या दैवतांची उपासना करण्यास सुरवात कराल.”

निर्गम 34:12

सावध राहा! तू ज्या देशात जात आहेस त्यात राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करारमदार करु नकोस; जर तसे करशील तर तुमच्यावर संकट येईल.

गणना 33:55

“तुम्ही त्या लोकांना जबरदस्तीने बाहेर काढा, जर तुम्ही त्यांना तिथेच राहू दिले तर ते तुमच्यावर अनेक संकटे आणतील. ते तुमच्या डोव्व्यातील कुसळासारखे आणि शरीरातल्या काट्यासारखे बोचतील. तुम्ही ज्या देशात रहाल त्या देशात ते अनेक संकटे आणतील.

अनुवाद 7:2

तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.

अनुवाद 12:30

एवढे झाल्यावर एक खबरदारी घ्या. त्यांचा पाडाव झाल्यावर तुम्हालाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल. आणि त्यांच्या देवांच्या भजनी लागाल. तेव्हा सावध. त्यांच्या दैवतांच्या नादी लागू नका. ‘या लोकांनी ज्याप्रकारे पूजा केली तशीच मी आता करतो’ असे मनात आणू नका.

अनुवाद 13:8

त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची कणव येऊ देऊ नका. त्याला मोकळा सोडू नका. तसेच त्याला संरक्षण देऊ नका.

अनुवाद 13:9

त्याला ठार करा. त्याला दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरुवात करा. मग इतर जण त्याला दगडांनी मारतील. कारण मिसरमधून ज्याने तुम्हाला दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हाला बहकवायचा प्रयत्न करत आहे.

अनुवाद 19:13

तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा.

अनुवाद 19:21

तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार? [22] तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.

अनुवाद 25:12

तसे केल्यास दयामाया न दाखवता तिचा हात तोडावा.

यहोशवा 23:13

शत्रूला पराभूत करायला तुमचा परमेश्वर देव तुम्हाला मदत करणार नाही. हे लोक तुमच्यासाठी सापळा ठरतील डोव्व्यांत धूर आणि धूळ जाऊन त्रास व्हावा तसा तुम्हाला या लोकांमुळे त्रास होईल. मग तुम्हाला ही चांगली भूमी सोडावी लागेल. परमेश्वराने तुम्हाला ती दिली. पण त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुम्ही देशोधडीला लागाल.

शास्ते 2:3

“म्हणून मी म्हणतो, “आता या लोकांना त्यांचा देश सोडून जायला मी भाग पाडणार नाही. तुमच्यापुढे ते समस्या निर्माण करतील. त्यांचा पाश तुमच्याभोवती पडेल. त्यांच्या खोठ्या देवता जाळ्यांप्रमाणे तुम्हाला अडकवून टाकतील.”’

शास्ते 2:12

परमेश्वराने इस्राएल लोकांना मिसरमधून बाहेर आणले होते. आणि त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराची उपासना केली होती. पण आता या इस्राएल लोकांनी परमेश्वराचे अनुसरण करण्याचे सोडून दिले होते. आणि त्यांच्या अवती भोवतीच्या लोकांच्या खोठ्या दैवतांची पूजा करायला सुरुवात केली होती. याचा परमेश्वराला संताप आला.

शास्ते 3:6

इस्राएल लोकांनी त्यांच्याशी बेटीव्यवहार केला. त्यांच्या मुलींशी लग्रे केली. तसेच आपल्या मुली त्यांच्या मुलांना दिल्या. तसेच त्यांच्या दैवतांची इस्राएल लोक उपासना करु लागले.

शास्ते 8:27

या सोन्यातून गिदोनने एफोद बनवला तो त्याने आपल्या अफ्रा या गावी ठेवला. सर्व इस्राएल लोक त्याची पूजा करु लागले. परमेश्वरावरची त्यांची निष्ठा ढळून ते एफोदच्या नादी लागले. गिदोन आणि त्याचे कुटुंब यांना हा एफोद सापव्व्याप्रमाणे ठरुन त्यांना पापाचरणासाठी प्रवृत्त करायला कारणीभूत झाला.

स्तोत्रसंहिता 106:36

ते लोक देवाच्या माणसांसाठी सापळा बनले. ते लोक ज्या देवाची प्रार्थना करीत होते त्याच देवाची पूजा करायला देवाच्या माणसांनी सुरुवात केली.

यिर्मया 21:7

असे घडल्यावर,” हा परमेश्वराचा संदेश आहे, ‘मी यहूदाचा राजा सिद्कीया याला, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या स्वाधीन करीन. मी सिद्कीयाच्या अधिकाऱ्यानासुद्धा नबुखदनेस्सरच्या हवाली करीन. यरुशलेममधील काही लोक भयंकर रोगराई अथवा लढाई वा उपासमार याने मरणार नाहीत. पण त्या सर्वांना मी नबुखद्नेस्सरच्या ताब्यात देईन. मी यहूदाच्या शत्रूला विजयी करीन. नबुखद्नेस्सरच्या सैन्याला यहूदातील लोकांना ठार मारायचे आहे म्हणून यहूदातील व यरुशलेममधील लोक तलवरीच्या घावाने मारले जातील. नबुखद्नेस्सर त्या लोकांना अजिबात दया दाखविणार नाही व त्यांच्याबद्दल त्याला दु:खही वाटणार नाही.’

1 करिंथकरांस 15:33

फसू नका, “वाईट सोबती चांगल्या सवयी बिघडवितात.”

Interlinear

Choose Theme