Home Bibles योहान 19:19 · मराठी बायबल
योहान 19:19 · मराठी बायबल

आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, “येशू नासरेथकर - यहूद्यांचा राजा”

Cross references

मत्तय 27:37

येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू - यहूद्यांचा राजा.”

मार्क 15:26

आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, ‘यहूद्याचा राजा’ असा लिहिला होता.

लूक 18:37

त्यांनी त्याला सांगितले की, “नासरेथकर येशू जात आहे.”

लूक 23:38

त्याच्यावर असे लिहिले होते: “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”

योहान 1:45

फिलिप्प नथनेलास भेटला व म्हणाला, “मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेष्ट्यांनीही लिहिले. तो आम्हांला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे, तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे.”

योहान 1:49

मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.

योहान 18:33

मग पिलात पुन्हा राजवाड्यात गेला. येशूला बोलावले आणि विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?’

योहान 19:3

ते त्याच्याजवळ वारंवार येऊन त्याला म्हणाले,’ ‘हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असोे!’ आणि त्यांनी त्याच्या तोंडावर मारले.

योहान 19:12

तेव्हापासून पिलाताने येशूला सोडण्याचा प्रयत्न केला, पण यहूदी मोठमोठयाने ओरडत राहिले, “जर तुम्ही या माणसाला जाऊ दिले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वत: राजा असल्याचा दावा करतो, तो कैसराला विरोध करतो.”

योहान 19:14

तो तर वल्हांडणाची तयारी करण्याचा दिवस असून दुपारची केळ झाली होती.

योहान 19:21

यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, ‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका, ‘तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे’ “असा दावा करतो, असे लिहा.”

प्रेषितांचीं कृत्यें 3:6

परंतु पेत्र म्हणाला, “माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही, परंतु माझ्याकडे दुसरे काही तरी आहे, ते मी तुला देतो: नासरेथच्या येशू रिव्रस्ताच्या नावाने ऊठ आणि चालू लाग!”

प्रेषितांचीं कृत्यें 26:9

नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते.

Interlinear

Choose Theme