Home Bibles योहान 1:49 · मराठी बायबल
योहान 1:49 · मराठी बायबल

मग नथनेल येशूला म्हणाला, “रब्बी (गुरूजी) तुम्ही देवाचे पुत्र आहात. तुम्ही इस्राएलाचे राजे आहात.

Cross references

स्तोत्रसंहिता 110:1

परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन. माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”

यशया 9:7

त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.

यिर्मया 23:5

हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी चांगला अंकुर निर्माण करण्याची वेळ येत आहे.” तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल. देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल.

यहेज्केल 37:21

लोकांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएल लोक वेगवेगळ्या राष्टांत गेले आहेत. तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सगळीकडून आणून, एकत्र गोळा करीन आणि त्यांना त्यांच्या देशात परत आणीन.

दानीएल 9:25

दानीएल, ह्या गोष्टी शिकून, समजावून घे. परत जा व यरुशलेम वसवा,” हा संदेश मिळाल्यापासून निवडलेला राजायेईपर्यंतचा काळ सात आठवड्यांचा असेल मग यरुशलेम पुन्हा वसविली जाईल. यरुशलेममध्ये पुन्हा लोकांना एकत्र येण्यासाठी जागा बांधल्या जातील. नगरीच्या संरक्षणासाठी नगरीभोवती चर असेल. आठवड्यांत यरुशलेम वसविली जाईल पण ह्या काळात खूप संकटे येतील.

होशेय 3:5

ह्यानंतर इस्राएलचे लोक परत येतील. मग ते परमेश्वराला म्हणजेच त्यांच्या देवाला आणि दीवीदाला म्हणजेच त्यांच्या राजाला शोधतील. शेवटच्या दिवसांत, ते परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आदर करतील.

मीखा 5:2

बेथलहेम एफ्राथा, तू यहूदातील सर्वात लहान गाव आहेस. तू इतका लहान आहेस की तुझ्या कुटुंबाची मोजदाद करणेही अशक्य आहे. पण “इस्राएलचा राज्याकर्ता” माझ्यासाठी तुझ्यातून येईल. त्याचा प्रारंभ प्राचीन काळापासून, अनंत काळापासून, झाला आहे.

सफन्या 3:15

का? कारण परमेश्वराने तुला शिक्षा करण्याचे थांबविले आहे. त्यांने तुझ्या शत्रूंचे भक्‌कम मोर्चे नष्ट केले आहेत. इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची काळजी करण्याचे कारण नाही.

जखऱ्या 6:12

सर्व शक्तिमान परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: ‘कोंब’ नावाचा एक माणूस आहे. तो सामर्थ्यवान बनेल. तो परमेश्वराचे मंदिर बांधील.

जखऱ्या 9:9

सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.

मत्तय 2:2

आणि त्यांनी विचारले, “यहूद्यांचा नुकताच जन्मलेला राजा कोठे आहे? कारण त्याचा जन्म सूचित करणारा तारा आम्ही पूर्व दिशेस पाहिला म्हाणून त्याला नमन करण्यास आलो आहोत.”

मत्तय 14:33

तेव्हा जे नावेत होते ते त्याला नमन करून म्हणाले, तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.

मत्तय 21:5

सोयोनेच्या कन्येला सांग, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे, होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर.”‘ जखऱ्या 9:9

मत्तय 27:11

राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्याला प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”

मत्तय 27:42

ते म्हणू लागले, “याने दुसऱ्यांना वाचविले, परंतु तो स्वत:चा बचाव करू शकत नाही. लोक म्हणतात की, हा इस्राएल (यहूदी) लोकांचा राजा आहे. जर तो राजा असेल, तर त्याने वधस्तंभावरून खाली यावे. म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू!

लूक 19:38

ते म्हणाले, “‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’ स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”

योहान 1:18

कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे.

योहान 1:34

म्हणून मी लोकांना सांगतो: ‘तो (येशू) देवाचा पुत्र आहे.’ “

योहान 1:38

येशूने मागे वळून पाहिले तो दोघेजण आपल्यामागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले, “तुम्हांला काय पाहिजे?” ते दोघे म्हणाले, “गुरुजी (रब्बी), तुम्ही कोठे राहता?”

योहान 12:13

त्यांनी खजुरीच्या झाडाच्या फांद्या घेतल्या आणि त्याला भेटण्यास गेले. ते ओरडून जयघोष करीत होते. “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा धन्यावदित असो! इस्राएलचा राजा धन्यवादित असो! स्तोत्र.

योहान 18:37

पिलात म्हणाला, “तर तू एक राजा आहेस!” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे तू म्हणतोस तेव्हा बरोबर म्हणतोस. खरे पाहता, या कारणासाठी मी जन्मलो आणि सत्याविषयी साक्ष देण्यासाठी मी या जगात आलो. जे सर्व सत्याच्या बाजूचे आहेत ते माझे ऐकतात.”

योहान 19:19

आणि पिलाताने एक वाक्य लिहिले आणि ते वधस्तंभावर लावले. त्यावर असे लिहिले होते की, “येशू नासरेथकर - यहूद्यांचा राजा”

योहान 20:28

थोमा त्याला म्हणाला, “माझा प्रभु आणि माझा देव!”

Interlinear

Choose Theme