पिलताने विचारले, “सत्य काय आहे?” असे म्हणून तो पुन्हा यहूद्यांकडे गेल. आणि म्हणाला, “मला याच्यात काहीच अपराध सापडत नाही.
Cross references
लोकांनी इर्षेला पेटून येशूला पिलाताच्या हाती दिले होते हे पिलाताच्या ध्यानी आले.
लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”
पिलाताने पुन्हा विचारले, ‘का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?’ ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, ‘त्याला वधस्तंभावर खिळा!’
मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, “या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.”
तो त्यांना म्हणला, “तुम्ही या माणसाला तो लोकांना भडकावीत होता म्हणून आणले, आता मी त्याची तुमच्यासमोर चौकशी केली आहे आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध जे आरोप करीत आहात त्यासाठी मला काहीही आधार सापडत नाही.
पुन्हा एकदा पिलात बाहेर आला आणि यहूद्यांना म्हणाला, “पाहा! मी त्याला बाहेर तुमच्याकडे आणत आहे, तुम्हांला हे समजावे म्हणून की, मला त्याच्यावर दोषारोप ठेवायला कोणतेच कारण सापडत नाही.”
मुख्य याजक व त्यांचे रक्षक त्याला पाहताक्षणीच मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा! वधस्तंभावर खिळा!” पण पिलाताने उत्तर दिले, “तुम्ही त्याला घ्या व वधस्तंभावर खिळा. माझ्या दृष्टीने त्याच्यावर आरोप ठेवणयास कोणतेही कारण मला दिसत नाही.”
यहुद्यांच्या मुख्य याजकांनी पिलाताला विरोध केला. ते म्हणाले, ‘यहूद्यांचा राजा’ असे लिहू नका, ‘तर हा मनुष्य यहूदी लोकांचा राजा आहे’ “असा दावा करतो, असे लिहा.”
त्यांनी पौलाला धरले व अरीयपगाच्यासभेपुढे नेले ते म्हणाले, ‘तुम्ही आम्हांला जी नवी कल्पना शिकवीत आहात ती कृपा करुन स्पष्ट करुन सांगा.
जेव्हा लोकांनी ऐकले की, येशूला मरणातून पुन्हा उठविण्यात आले तेव्हा त्यांच्यातील काही जण हसू लागले. लोक म्हणाले, “आम्ही याविषयी नंतर पुन्हा ऐकू!”
परंतु जेव्हा पौलाने धार्मिकपणा, आत्मसंयमन, आणि होणाऱ्या न्यायाविषयी सांगितले. तेव्हा फेलिक्सला भीति वाटली. तो पौलाला म्हणाला, “आता तू जा, परत वेळ मिळाला म्हणजे मी तुला बोलावीन.”
तर कसलाही डाग किंवा दोष नसलेल्या कोकऱ्यासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली आहे.
“त्याने कोणतेही पाप केले नाही, त्याच्या मुखात कपट नव्हते.”