Home Bibles लूक 23:14 · मराठी बायबल
लूक 23:14 · मराठी बायबल

तो त्यांना म्हणला, “तुम्ही या माणसाला तो लोकांना भडकावीत होता म्हणून आणले, आता मी त्याची तुमच्यासमोर चौकशी केली आहे आणि तुम्ही त्याच्याविरुद्ध जे आरोप करीत आहात त्यासाठी मला काहीही आधार सापडत नाही.

Cross references

दानीएल 6:4

पण इतर दोघा पर्यवेक्षकांना आणि सर्व प्राताधिकाऱ्यांना (सत्रपांना) ह्या बेताविषयी कळताच ते दानीएलचा द्वेष करू लागले. दानीएलला दोष देण्यासाठी काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्यासाठी दानीएल राज्यकारभार करताना ज्या ज्या गोष्टी करी त्या त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी नजर ठेवली. पण त्यांना दानीएलची चूक सापडली नाही. त्यामुळे ते दानीएलला दोषी ठरवू शकले नाहीत. दानीएल अतिशय प्रामाणिक व विशवासू होता. क्ष्याने राजाला फसविले नाही. तो अतिशय कष्ट करीत असे.

मत्तय 27:4

तो म्हणाला, “मी पाप केले आहे, मी एका निष्पाप मनुष्याला जिवे मारण्यासाठी तुमच्या हाती दिले.”यहूदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, “आम्हांला त्याचे काय? तो तुझा प्रश्न आहे!”

मत्तय 27:19

न्यायासनावर बसला असता पिलात हे बोलला. तो तेथे बसलेला असतानाच त्याच्या पत्नीने त्याला एक निरोप पाठविला. तो निरोप असा होता: “या मनुष्याविषयी सावध राहा; कारण तो दोषी नाही. त्याच्याविषयी स्वप्न पडल्यामुळे मला आज दिवसभर फार दु:ख सहन करावे लागेले आहे.”

मत्तय 27:24

लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”

मत्तय 27:54

सेनाधिकारी व त्याच्याबरोबर येशूवर जे शिपाई पहारा देत होते त्यांनी भूकंप व जे काही घडले ते पाहिले. आणि ते फार भ्याले. ते म्हणाले, “हा मनुष्य खरोखर देवाचा पुत्र होता.”

लूक 23:1

मग त्यांचा सर्व समुदाय उठला, व त्यांनी त्याला (येशूला) पिलाताकडे नेले.

लूक 23:4

मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, “या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.”

प्रेषितांचीं कृत्यें 13:28

येशूने का मरावे याचे खरे कारण ते शोधू शकले नाहीत. पण त्यांनी पिलाताला सांगितले की त्याला जिवे मारावे.

इब्री लोकांस 7:26

म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाण्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.

Interlinear

Choose Theme